अमरावतीमध्ये आणखी एका मृतासह चार पॉझिटिव्ह कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 10:46 IST2020-05-02T10:46:10+5:302020-05-02T10:46:38+5:30
अमरावती शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शनिवारी सकाळी एक मृत व्यक्तीसह अन्य तीन व्यक्तींचे थ्रोट स्वँब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४७ वर पोहोचली आहे.

अमरावतीमध्ये आणखी एका मृतासह चार पॉझिटिव्ह कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४७
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शनिवारी सकाळी एक मृत व्यक्तीसह अन्य तीन व्यक्तींचे थ्रोट स्वँब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४७ वर पोहोचली आहे. येथील कंवर नगरातील एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यूपश्चात तीन दिवसांनी अहवाल पॉझिटिव्ह आला. मृताच्या परिवारातील तीन व्यक्तींचे नमुने यापूर्वीच पॉझिटिव्ह आले आहेत. त्या व्यतिरिक्त क्लस्टर उपचार सुरु आहे. हॉटस्पॉटमधील ताजनगर येथील दोन व्यक्ती व तारखेड मृत पॉझिटिव्हचे संपकार्तील अन्य एक व्यक्तीचा अहवाल पाझिटिव्ह आलेला आहे. अमरावती शहरात एकूण कोरोनाग्रस्त ४७, यामध्ये मृत ८, कोरोनामुक्त ४ व ३५ बाधितांवर येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.