अचलपूरात काँग्रेस पक्षाच्यावतीने मशाल यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:16 IST2021-08-21T04:16:31+5:302021-08-21T04:16:31+5:30

भारताला स्वातंत्र्याच्या ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अचलपुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ...

Torch procession on behalf of Congress party in Achalpur | अचलपूरात काँग्रेस पक्षाच्यावतीने मशाल यात्रा

अचलपूरात काँग्रेस पक्षाच्यावतीने मशाल यात्रा

भारताला स्वातंत्र्याच्या ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अचलपुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणाची आहुती देऊन बलिदान दिलेल्या शहिदांच्या पावन स्मृतीस शहीद स्मारक जवळ अभिवादन करून अचलपुरात मशाल यात्रा काढण्यात आली. अमरावती ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या मार्गदर्शनात ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीधर काळे, अचलपूर शहर काँग्रेस अध्यक्ष श्रीकांत झोडपे, पप्पू सेठ चंदन आणि ज्ञानेश्वर राऊत, कैलास आवारे, सुनील तायडे, नामदेव तनपुरे, रवी गोडबोले, दिनेश वानखडे, राहुल गाठे, शैलेश मला, प्रशांत गोरले, धीरज शहा यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

200821\img-20210820-wa0039.jpg

अचलपुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने मशाल यात्रेचे आयोजन

Web Title: Torch procession on behalf of Congress party in Achalpur