धामणगावात तक्रारींसाठी आता टोल फ्री क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 22:05 IST2018-07-27T22:04:48+5:302018-07-27T22:05:26+5:30
पाणी, रस्ते, स्वच्छता तसेच पायाभूत सुविधांबाबत अडचणींची तक्रार प्रत्येक नागरिकाला घरबसल्या मोबाइलवरून करता येणार आहे. या तक्रारीची नोंद, ट्रॅकिंग व फॉलोअप होऊन तक्रारकर्ता हा थेट नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल. नगर परिषदेने स्तरावर राबविलेला हा राज्यातील पहिला प्रयोग आहे.

धामणगावात तक्रारींसाठी आता टोल फ्री क्रमांक
ठळक मुद्देनगर पालिकेचा उपक्रम : राज्यात पहिला प्रयोग
<p>लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : पाणी, रस्ते, स्वच्छता तसेच पायाभूत सुविधांबाबत अडचणींची तक्रार प्रत्येक नागरिकाला घरबसल्या मोबाइलवरून करता येणार आहे. या तक्रारीची नोंद, ट्रॅकिंग व फॉलोअप होऊन तक्रारकर्ता हा थेट नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल. नगर परिषदेने स्तरावर राबविलेला हा राज्यातील पहिला प्रयोग आहे.
धामणगावचे नगराध्यक्ष प्रताप अडसड यांनी जनतेच्या सुविधांना प्राधान्य दिले आहे. यामुळे आयआयएमएस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नागरिकांना आपली तक्रार घरी बसून नोंदविता येणार आहे.
प्रत्येक नागरिकाचे होणार समाधान आयआयएमएस हे सॉफ्टवेअर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये काम करेल. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जनतेच्या तक्रारींच्या वर्गीकरणानुसार वेगवेगळ्या विभागांत प्रत्येकाची तक्रार पोहोचेल. याद्वारे प्रत्येकाचे समाधान होणार आहे.
कमी दिवसांत होणार तक्रारींचे निरसन
कुठल्याही तक्रार किंवा माहितीची सॉफ्टवेअरमध्ये नोंद होताच त्यामधील संबंधित विभागाच्या डॅशबोर्डवर तक्रार किंवा माहिती प्रदर्शित होईल तसेच संबंधित विभागीय अधिकाºयाला एसएमएसच्या माध्यमातून तक्रार वा माहिती पाठविली जाईल. त्याचवेळी तक्रार करणाºया व्यक्तीला तक्रार क्रमांक एसएमएसद्वारे पाठविण्यात येणार आहे. सदर तक्रारींचे निरसन कमीत कमी कालावधीत करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
धामणगावात सेवेचा प्रारंभ
शहरातील युवा तंत्रज्ञ शशांक तायवाडे यांनी तयार केलेल्या या टोल फ्रÞी क्रमांक सेवेचा प्रारंभ नगराध्यक्ष प्रताप अडसड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष देवकरण रॉय, नगरसेवक हेमकरण कांकरिया, संतोष पोळ, पद्माकर पाटील, सुनील जावरकर, विनोद धुवे, शुभम किन्नाके, सीमा देवतळे, दर्शना ठाकूर, अर्चना गोडबोले, अर्चना ठाकरे, आठवले ताई, संजय जांगडा, मुख्यधिकारी सुमेध अलोणे, शशांक तायवाडे, मनीष मुंधडा, राजू पसरी, छगन जाधव, राजू चौबे, सलमान खान आदी उपस्थित होते.