आज गुरूपौर्णिमा आहे, आईला शिव्या देऊ नकोस... असे बोलून मोठ्या भावाने केला धाकट्या भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 13:26 IST2021-07-24T13:25:44+5:302021-07-24T13:26:10+5:30
Amravati News कारंजा घाडगे तालुक्यात असलेल्या एका अर्जुन या गावी रहात असलेल्या बारंगे कुटुंबात शुक्रवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री, मोठ्या भावाने मद्यधुंद अवस्थेतील धाकट्या भावाचा कुऱ्हाडीने खून केला.

आज गुरूपौर्णिमा आहे, आईला शिव्या देऊ नकोस... असे बोलून मोठ्या भावाने केला धाकट्या भावाचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: कारंजा घाडगे तालुक्यात असलेल्या एका अर्जुन या गावी रहात असलेल्या बारंगे कुटुंबात शुक्रवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री, मोठ्या भावाने मद्यधुंद अवस्थेतील धाकट्या भावाचा कुऱ्हाडीने खून केला.
विनोद मिस्त्री (२७)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो गेल्या पंधरा दिवसांपासून कामानिमित्त बाहेरगावी होता. शुक्रवारी रात्री घरी आल्यानंतर तो दारु प्यायल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले. या कारणावरून दोघात वाद झाला. त्यात विनोदने आईला शिवीगाळ सुरू केली. यावेळी त्याने आईने बनवलेला स्वयंपाक फेकून दिल्याचेही कळते. त्यामुळे त्याचा मोठा भाऊ तुकाराम भीमराव बारंगे (३०) याने धाकट्या भावाला समजावण्याचा प्रयत्न केला. आज गुरुपौर्णिमा आहे, तू आईला शिव्या देऊ नको, असे म्हटल्यानंतरही त्यांच्यातील वाद सुरू राहिला. अखेर संतप्त होऊन तुकारामने विनोदवर कुऱ्हाडीने वार केले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तुकाराम बारंगे याला अटक करण्यात आली आहे.