लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका निवडणुकीचे मतदान १५ जानेवारी रोजी होऊ घातले आहे. पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वात शहर पोलिस दलाचे सुमारे १७०० अधिकारी, कर्मचारी कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी 'ऑन रोड' राहणार आहेत.
निवडणुकीसाठी पोलिस खात्याची तयारी
शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी भक्कम पूर्वतयारी करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून पोलिसांनी ती पूर्वतयारी हाती घेतली होती.
१३२ अधिकारी, १६५० - पोलिस कर्मचारी
महापालिका निवडणुकीसाठी शहर आयुक्तालयातील १३२ पोलिस अधिकारी व १६५० पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत. त्यातील पोलिस अंमलदार बुधवारीच मतदान केंद्रावरदेखील पोहोचले आहेत.
१६ तपासणी पथकातही पोलिस कर्मचारी
महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी व गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्यासाठी गुन्हे शाखेची आठ व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची आठ स्पेशल पेट्रोलिंग पथकेदेखील नेमण्यात आली आहेत.
काही उपद्रवी शहराबाहेर
आयुक्तालयाने काही उपद्रवींना मतदानापुरते शहराबाहेर पाठविले आहे. तर मतदानाच्या पार्श्वभूमिवर ७३७ जणांविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ती कारवाई निरंतर सुरू असेल.
Web Summary : Amravati police deploy 1700 personnel for the municipal election on January 15th. Extensive security measures, including preventative actions against 737 individuals and patrol teams, are in place to ensure peaceful voting. Some troublemakers were sent out of city.
Web Summary : अमरावती पुलिस ने 15 जनवरी को होने वाले नगर निगम चुनाव के लिए 1700 कर्मियों को तैनात किया। शांतिपूर्ण मतदान सुनिश्चित करने के लिए 737 व्यक्तियों और गश्ती टीमों के खिलाफ निवारक कार्रवाइयों सहित व्यापक सुरक्षा उपाय किए गए हैं। कुछ उपद्रवियों को शहर से बाहर भेजा गया।