शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

तिवसा बसस्थानक बनले समस्यांचे माहेरघर

By admin | Updated: March 11, 2016 00:29 IST

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तिवसा बसस्थानकास उतरती कळा लागली आहे.

दुर्गंधी, अस्वच्छतेचा कहर : विद्युत दिवे बंद, अंधाराचे साम्राज्यरोशन कडू तिवसा‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तिवसा बसस्थानकास उतरती कळा लागली आहे. हे बसस्थानक जणू समस्यांचे माहेरघर बनले आहे. प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळणे तर दूरच पण सायंकाळनंतर अंधाराचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांसह बसस्थानकाच्या परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सुमारे २० हजार लोकसंख्येचा टप्पा गाठत असलेले आणि अमरावती-नागपूर महामार्गावर वसलेले तिवसा पंचक्रोशीतील मध्यवर्ती गाव. तिवसासह तालुक्यातील तळेगाव ठाकूर, शेंदूरजनाबाजार, सुरवाडी, वरखेड, भारवाडी या गावांसह प्रवासी वर्गाची नेहमी वर्दळ असते. प्रशस्त जागा असलेल्या येथील स्थानकातून लांब पल्ल्याच्या बसेसही मोठ्या प्रमाणात धावतात. मात्र बसस्थानकात प्रवाशांच्या दृष्टिकोनातून सुविधा नसल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत वाहनचालकांकडे विचारपूस केली असता सायंकाळी अंधार पडल्यानंतर स्थानकात दिवे नसताना येथे कोण बसची वाट पाहत उभे राहील. त्यामुळे आम्ही बस सरळ तीनपाटीवर घेऊन जातो, अशी प्रतिक्रिया काही चालकांनी दिली. स्थानकात विविध सुविधांचा अभाव आहे. दिवसा अनेक प्रवासी बसस्थानकात बसची वाट पाहत थांबलेले असतात. परंतु येथे प्रवाशांसाठी म्हणावी तशी सुविधा उपलब्ध नाही. पिण्याच्या टाकी आहे पण नळांना तोट्या नाही. पूर्वी येथे प्रवाशांना नाश्त्यासाठी एक कॅन्टीन होती. पण ती सात ते आठ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. बसस्थानकालगत स्वच्छतेअभावी त्याची बिकट अवस्था झाली आहे. स्वच्छतागृहात घाणीचे साम्राज्य असून त्यात प्रवेश करताच उग्र दुर्गंधीमुळे प्रवासी नाकाला हात लावत सरळ बाहेर पडतात. स्वच्छतागृहात साफसफाई नसल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. पाय ठेवायलाही स्वच्छ जागा नसल्याने प्रवासी स्वच्छतागृहाच्या बाहेर आडोसा बघून आपली सोय करून घेताना दिसतात. बसस्थानकात सायंकाळी काळोखानंतर बस प्रवेश करीत नसल्याने प्रवासी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला बसची वाट बघत उभे असतात. दिवसभरही अनेक प्रवासी बाहेरच उभे राहून बसची वाट बघतात. संबंधित विभागाकडून समस्यांबाबत तत्काळ निर्णय घेऊन गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.