Tiranga Yatra: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने काढण्यात आली अखंड तिरंगा यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:42 IST2022-08-09T16:41:17+5:302022-08-09T16:42:09+5:30
Tiranga Yatra: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षां निमित्त 9 ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अमरावती शहरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

Tiranga Yatra: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने काढण्यात आली अखंड तिरंगा यात्रा
- मनीष तसरे
अमरावती - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षां निमित्त 9 ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अमरावती शहरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.
याची सुरुवात आज 9 ऑगस्ट रोजी शहरातून अखंड तिरंगाध्वज यात्रा काढून करण्यात आली. पाचशे फुट लांबीच्या या अखंड तिरंगाध्वज यात्रेत गणेश राठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी,शिक्षकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
या तिरंगा यात्रेत स्वतंत्रता अमृत महोत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.