ब्रह्मचर्येतूनच ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर

By Admin | Updated: December 25, 2015 01:15 IST2015-12-25T01:15:13+5:302015-12-25T01:15:13+5:30

सुश्री अलकाश्रीजी : रामकथा प्रवचनाला भाविकांची अलोट गर्दी

Through the Brahmacharya, the path of God is realized | ब्रह्मचर्येतूनच ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर

ब्रह्मचर्येतूनच ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर

सुश्री अलकाश्रीजी : रामकथा प्रवचनाला भाविकांची अलोट गर्दी
धामणगाव रेल्वे : रामायणातील सुंदर कांड म्हणजे जीवनात आनंद देणारा ठेवा आहे. भक्ती आणि देवांचे मिलन या सुंदरकांडमध्ये मारोतीरायांनी घडवून आणले आहे. यात ब्रह्मचर्येला विशेष महत्त्व दिले गेले आहे. ब्रह्मचर्य म्हणजेच ईश्वरप्राप्ती आहे, असे प्रतिपादन सुश्री अलकाश्रीजींनी केले.
रामचंद्र भागचंद ट्रस्टच्या मैदानावर आयोजित श्रीराम कथेदरम्यान उपस्थित हजारोे, महिला, पुरूष व वृध्दांना त्या संबोधित करीत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, मानवाने अभिमान सोडून गुरूभक्ती करावी. गुरू भक्तीमुळे जीवन सफल होते. गुरूच्या संगतीमुळेच जीवन सुधारते. जोे गुरूंचा अपमान करतोे, ईश्वराबद्दल अपशब्द काढतो, त्याला गौहत्येचेच पातक लागते, असेही त्यांनी सांगितले. रावणाला त्याची पत्नी मंदोदरीसह वालीपूत्र अंगद याने वारंवार समजविले होते की, तू सीतामाईला मुक्त कर नाही तर नाश होील. परंतु अभिमानाने व्यापलेले मन असल्याने रावणाने ते मानले नाही.
शेवटी रामाकडूनच त्याचा अंत झाला. सुंदरकाण्डाच्या ६० चौपार्इंना ३० विविध हिंदी व मराठी भक्तीगीतांमध्ये सामिल करून व त्यांचे गायन करून सुश्री अलकाश्रीजी यांनी उपस्थित भक्तांना मोहून टाकले. त्या म्हणाल्या की, ज्या व्यक्तिची जीभ रामनाम घेण्यास पुढे रेटत नाही त्या जिव्हेला काही अर्थ उरत नसतोे. सहाव्या व सातव्या दिवशीदेखील प्रवचनाचा लाभ घेण्याकरिता हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Through the Brahmacharya, the path of God is realized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.