शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, तीन युवक ठार; अपघातानंतर कारचालक शिक्षक पसार

By गणेश वासनिक | Updated: November 14, 2022 17:04 IST

मध्य प्रदेशच्या देढपाणी येथील घटना; तिन्ही मृत तरुण अचलपूर तालुक्यातले

परतवाडा (अमरावती) : मध्यप्रदेशच्या भैसदेही तालुक्यातील देडपाणीनजीक सोमवारी सकाळी ११.३० दरम्यान कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत अचलपूर तालुक्यातील तीन युवक ठार झाले. अपघात करणारे चारचाकी वाहन मेळघाटातील एका शिक्षकाचे असून वृत्त लिहिस्तोवर शिक्षकाने अपघात होताच पळ काढण्याची माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी 'लोकमत'शी बोलताना दिली

राज किशोर नागापुरे (वय २३ रा. येणी पांढरी ता. अचलपूर जि अमरावती), अंकुश सुरजलाल पारस्कर (वय ३२ रा.येणी पांढरी ता. अचलपूर जि. अमरावती), अमित भगवान ठाकूर (३२ रा.वडगाव फत्तेपूर ता. अचलपूर जि. अमरावती) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तिघेही मित्र सकाळी दुचाकीने चिखलदरा तालुक्यातील घटांग मार्गे काटकुंभकडे जात असताना कारने माखला मार्गावर देढपाणीजवळ त्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील तिन्ही युवक दूरपर्यंत रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. जखमींना उपचारार्थ हलविण्यापूर्वीच दोघांनी घटनास्थळीच अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच भैसदेही पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक पवन कुमरे, पोलीस शिपाई  विनोद आर, सैनिक दिनेश देवले आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतकांचे छवविच्छेदन करण्यासाठी भैसदेही येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघात करून शिक्षक पसार 

सदर अपघात (एम एच २७ बी व्ही ७९७८) क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने झाला. अपघात झाल्यावर कार चालकाने तेथून पळ काढण्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात मध्यप्रदेश पोलिसांजवळसुद्धा माहिती नव्हतीदोन युवक ऑटोचालक 

तिन्ही युवक एका दुचाकीने अखेर कुठे जात होते या संदर्भात पोलीस माहिती घेत आहे. तर यातील दोन युवक परतवाडा व गावात ऑटो चालकाचा व्यवसाय करीत होते. पुढील तपास मध्य प्रदेश पोलीस करीत आहेमेळघाट मध्यप्रदेश मार्गावरून ये जा

मध्य प्रदेश सह मेळघाटच्या  चिखलदरा तालुक्याच्या गावांना जाण्यासाठी या मार्गाचा वापर होतो तालुक्यातील घटांग नंतर पुन्हा मध्य प्रदेशच्या कुकरू खामला  देडपाणी या गावांचा समावेश होतो त्यानंतर पुन्हा चिखलदरा तालुका काटकुंभ डोमा चोरणी अशी जवळपास ५२ आदिवासी पाडे आहेत. त्यामुळे येथून परिसरात येजा करण्यासाठी मध्य प्रदेशच्या रस्त्यावरूनच ये जा करावी लागते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAmravatiअमरावती