ब्रिटिशकालीन तीन कार पोलिसांनी केल्या मूळ मालकाला सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST2021-01-08T04:38:28+5:302021-01-08T04:38:28+5:30
(फोटो आहे) अमरावती : चोरीच्या गुन्ह्यात आरोपीकडून पोलिसांनी जप्त केलेल्या तसेच फ्रेजरपुरा ठाण्यात गत आठ वर्षांपासून भंगारात पडलेल्या ब्रिटिशकालीन ...

ब्रिटिशकालीन तीन कार पोलिसांनी केल्या मूळ मालकाला सुपूर्द
(फोटो आहे)
अमरावती : चोरीच्या गुन्ह्यात आरोपीकडून पोलिसांनी जप्त केलेल्या तसेच फ्रेजरपुरा ठाण्यात गत आठ वर्षांपासून भंगारात पडलेल्या ब्रिटिशकालीन तीन कार न्यायालयाच्या आदेशानंतर गुरुवारी मूळ मालकाला सुपूर्द करण्यात आल्या.
पोलीससूत्रानुसार, दिलीपसिंह बग्गा (७५, रा. बियाणी चौक) यांनी १९१३, ते १९२३ दरम्यान निर्माण झालेल्या फोर्ड कंपनीच्या त्या काळातील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या तीन कार त्यांनी ४० वर्षांपूर्वी प्रत्येकी १० ते १५ हजारांत विकत घेतल्या होत्या. त्यांना त्या काळातील कार विकत घेण्याची व त्याला दुरुस्त करून चालविण्याची आवड असल्याने त्यांनी त्या तीनही कार दुरस्तीकरिता २०१३ साली नागपूर येथील एका जुन्या कार दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिककडे टाकल्या. मात्र त्याने सदर कार अमरावतीच्या फ्रेजरपुरा ठाणे हद्दीत परस्पर विकल्या. याप्रकरणी बग्गा यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोेलिसांनी मेकॅनिकविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. हा गुन्हा पोलिसांनी तातडीने उघड करून सदर तीनही कार जप्त केल्या होत्या. तेव्हापासून या गुन्ह्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. अमरावती न्यायालयाने सदर कार मूळ मालकाला सुपूर्द करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यावरून गुरुवारी क्रेनच्या साह्याने त्या काळातील देखण्या असले्ला मात्र भंगार स्थितीत असलेल्या कारला ट्रकमध्ये ठेवण्यात आले. याप्रकरणी फ्रेजरपुराचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करून मूळ मालकाच्या स्वाधीन केल्या.
कोट
सदर कार ब्रिटिशांच्या काळातील आहेत. मला आवड असल्याने मी ४० वर्षांपूर्वी मी तीन कार विकत घेतल्या होत्या. मात्र, दुरुस्ती दरम्याने फसवणूक झाली. आता पुन्हा तीन कारची एक कार तयार करून तीन अँन्टीक पीस म्हणून ठेवण्याचा मानस आहे.
- दिलीपसिंह बग्गा,
नागरिक अमरावती