तीन शाखा अभियंत्यांना डांबले

By Admin | Updated: August 5, 2014 23:14 IST2014-08-05T23:14:32+5:302014-08-05T23:14:32+5:30

तालुक्यात काही दिवसांपासून गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असतांनाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील जीवन प्राधिकरण

Three branch engineers stampede | तीन शाखा अभियंत्यांना डांबले

तीन शाखा अभियंत्यांना डांबले

मनसेचे आंदोलन : दूषित पाणीपुरवठ्याने आरोग्य धोक्यात
दर्यापुर : तालुक्यात काही दिवसांपासून गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असतांनाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथील जीवन प्राधिकरण कार्यालयातील तीन शाखा अभियंत्यासह लिपीकाला व अभियंत्यांना दोन तास डांबून ठेवले.
शहानूर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दर्यापूर शहराला पाणीपुरवठा होतो. परंतु शहानूर धरणावरील जलशुध्दीकरण यंत्रात अनेक दिवसांपासून बिघाड झाला असून शहरासह तालुक्याला गढूळ व दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मनसेचे जिल्हा सचिव गोपाल चंदन यांनी कार्यालयाला भेट दिली. अभियंत्यांनी त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी शाखा अभियंता व्ही.एस. दहिभाते, शाखा अभियंता डि.के. राऊत, शाखा अभियंता ए.एल. बोरखडे, तांत्रिक सहाय्यक अभय देशमुख, वरिष्ठ लिपीक गजानन भांडे यांना तब्बल दोन तास कार्यालयात डांबले. आंदोलनात गोपाल चंदन, जयंत वाकोडे आदींचा समावेश होता.

Web Title: Three branch engineers stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.