अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या तिघांना गुजरातेतून अटक
By Admin | Updated: February 28, 2017 00:05 IST2017-02-28T00:05:50+5:302017-02-28T00:05:50+5:30
एका १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळविल्यानंतर तीच्यावर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात ..

अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या तिघांना गुजरातेतून अटक
फ्रेजरपुरा पोलिसांची कारवाई : अपहरण, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
अमरावती : एका १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळविल्यानंतर तीच्यावर एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी तिन आरोपींना गुजरातवरून रविवारी रात्री अटक केली. सुमित रामकृष्ण बोरकर (२०), स्वाती वासुदेव शितोडे (२०) व अक्षय केशव खांडेकर (२१,सर्व राहणार वडाळी) अशी अटक आरोपींची नावे आहे.
वडाळी परिसरातील एक १६ वर्षीय मुलगी २० फे्रबुवारी रोजी घरातून बाहेर गेल्यावर पुन्हा परतली नव्हती. दरम्यान त्याच परिसरातील रहिवासी सुमित बोरकर, स्वाती शितोडे व अक्षय खांडेकर हे सुध्दा घरून निघून गेले होते. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने २१ फेब्रुवारी रोजी फे्रजरपुरा पोलीस ठाणे गाठून तिघांंविरुध्द तक्रार नोंदविली होती.
पोलीस कोठडीची मागणी
अमरावती : याप्रकरणात पीएसआय राम गिते यांच्या पथकाने चौकशी केली असता आरोपींचे मोबाईल लोकेशन प्राप्त होऊ शकले नाही. दरम्यान एका आरोपीची मावशी ही सूरत शहरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राम गिते व पथकातील पोलीस शिपाई नीलेश जाधव, राजू सायगन व सायबर सेलचे संग्राम यांनी थेट सूरत शहर गाठले. पोलिसांनी आरोपींच्या घराजवळ सापळा रचला. प्रथम आरोपी अक्षय हा घरातून बाहेर आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या घरातून अन्य आरोपी व त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. आरोपी व ती अल्पवयीन मुलगी एकाच खोलीत राहिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आरोपीसह त्या अल्पवयीन मुलीला सोमवारी अमरावतीत आणले. अपहरणाच्या गुन्ह्यात लैंगिक अत्याचार व पॉक्सो अॅक्ट वाढविला आहे.
सामूहिक बलात्काचीही शक्यता
आरोपी सुमित व अक्षय हे दोघेंही मित्र असून अक्षयची स्वाती ही पे्रयसी आहे. तिघांनीही १६ वर्षीय मुलीला फूस लावून गुजरातला नेले. त्या ठिकाणी एकाच खोलीत चौघेंही राहू लागले. दरम्यान त्या अल्पयवीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला असावा, अशी शंका पोलिसांनी वर्तविली आहे. त्या दिशेनेही पोलीस चौकशी करीत आहे.
नांदगावच्या मुलीचे अकोल्यात पलायन
नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक मुलगी घरून निघून गेल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता ती मुलगी अकोल्यात असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी त्या मुलीला अकोल्यातून ताब्यात घेतले असून तिच्यासोबत एक युवक असल्याचेही आढळून आले आहे.