अमरावतीत साडेतीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 20:33 IST2021-05-22T20:33:26+5:302021-05-22T20:33:42+5:30
Amravati news एका साडेतीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरात शनिवार घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी एका २८ वर्षीय आरोपीला अटक केली.

अमरावतीत साडेतीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : एका साडेतीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना शहरात शनिवार घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी एका २८ वर्षीय आरोपीला अटक केली.
पोलीस सूत्रांनुसार, साडेतीन वर्षीय चिमुकली घरात टीव्ही बघत होती. त्यावेळी आरोपी तिच्या घरात शिरला. त्याने चिमुकलीला उचलून आपल्या घरी नेले. त्यानंतर त्याने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने चिमुकलीला तिच्या घरी आणून सोडून दिले. काही वेळाने हा धक्कादायक प्रकार पीडितेच्या आईच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ घटनेची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी आराोपीविरुद्ध पोक्स व लैगिंक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला.