घरफोडीतील तीन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST2020-01-17T06:00:00+5:302020-01-17T06:00:32+5:30
विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस रेकॉर्डवर असलेले किशोर तेजराव वायाळ (४३, रा. मेरा बु. ता. चिखली. जिल्हा बुलडाणा), राजू शिवाजीराव इंगळे (३७, रा. बारई ता. मेहकर), आकाश प्रकाश पवार (२६, रा. साखरखेडा ता. मेहकर) अशी आरोपींची नाव आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, २० जानेवारीपर्यंत पीसीआर मिळाला.

घरफोडीतील तीन आरोपींना अटक
अमरावती : शहरातील दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील पोलिसांना हवे असलेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस रेकॉर्डवर असलेले किशोर तेजराव वायाळ (४३, रा. मेरा बु. ता. चिखली. जिल्हा बुलडाणा), राजू शिवाजीराव इंगळे (३७, रा. बारई ता. मेहकर), आकाश प्रकाश पवार (२६, रा. साखरखेडा ता. मेहकर) अशी आरोपींची नाव आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, २० जानेवारीपर्यंत पीसीआर मिळाला.
राजापेठ ठाण्यांतर्गत कक्कड ले-आऊटमधील रहिवासी फिर्यादी विनोद गुलाबराव सवई (५२) हे बाहेरगावी गेले असता, १४ नोव्हेंबर २०१९ रोजी अज्ञातने १२ ग्रॅम सोन्याचे दागिने व नगदी पाच हजार असा ५० हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे नोंदविले होते. सदर गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडून १० ग्रॅम सोने जप्त केले. दुसरी घरफोडीत साईनगर येथील रहिवासी अविनाश प्रतापराव शिवनेकर (४७) यांच्याकडे १४ मे २०१९ रोजी अज्ञाताने सोन्याचांदीचे दागिने असा २ लाख ३६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरोपीकडून ९० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त संजयकुमार बाविष्कर, उपआयुक्त मुख्यालय प्रशांत होळकर, उपआयुक्त यशवंत सोळंके, उपआयुक्त शशिकांत सातव, सहा. पोलीस आयुक्त. बी.डी.डाखोरे यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हे शाखेची पीआय कैलास पुंडकर, उपनिरीक्षक राम गिते, विकास रायबोले, जावेद अहमद आदींनी केली.