शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

‘जलयुक्त’ची १६ हजार कामे, तरीही शिवार कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:16 IST

मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात चार वर्षांत १६ हजार ४८२ कामे झालीत. पिकांना ऐनवेळी पाणी मिळावे व परिसराचा जलस्तर वाढावा, हा यामागील उद्देश आहे. मात्र, या चारही वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कामाची उपयोगिता सिद्ध झालेली नाही.

ठळक मुद्दे३५० कोटींचा निधी पाझरला कुठे ? : एका गावावर सरासरी सात ते ५१ लाखांचा खर्च, कामात पाणी मुरलेच नाही

गजानन मोहोड। लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्यात चार वर्षांत १६ हजार ४८२ कामे झालीत. पिकांना ऐनवेळी पाणी मिळावे व परिसराचा जलस्तर वाढावा, हा यामागील उद्देश आहे. मात्र, या चारही वर्षांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने कामाची उपयोगिता सिद्ध झालेली नाही. भूजलसाठी निधी पाझरला. मात्र, पाणी मुरलेच नाही. आज ही सर्व कामे तहानली आहे. त्यामुळे एका गावावर साधारणत: ७ ते ५२ लाखांचा खर्च झाला असताना शिवाराला कोरड लागल्याचे वास्तव आहे.दरवर्षीच सरासरीपेक्षा कमी पाऊस व दुष्काळ व नापिकीचे संकट जिल्ह्यावर ओढावत असल्याने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतशिवार हिरवेगार करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना निश्चितच चांगली आहे. मात्र, या अभियानाला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आणि शिवार कोरडेच राहिले. कागदावर मात्र, ८३,११६ टीएमसी साठा निर्माण झाला. मराठवाड्यात भीषण दुष्काळ असताना बीड, परळी आदी भागांतील यंत्रसामग्री जिल्ह्यात कामासाठी आली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना जलयुक्तच्या उल्लेखनीय कामासाठी पंतप्रधानांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचवर्षी जिल्ह्यातील भूजलपातळीत पाच मीटरपर्यंत घट झाली. जिल्ह्यात सन २०१५-१६ ते २०१८-१९ या कालावधीत तब्बल १,०५२ गावांमध्ये कामे करण्यात आली. यावर आतापर्यंत ३५० कोटींचा खर्च राज्य शासनाच्या १५ यंत्रणांनी केला. या कामांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या पाणीसाठ्यामुळे संरक्षित सिंचन करता आले, असे उदाहरण अजून प्रशासनाने समोर आणलेले नाही. त्यामुळे जलयुक्तमुळे केवळ राबविणाऱ्या यंत्रणांचेच शिवार हिरवे झाले. शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त ‘एनडीआरएफ’चा दुष्काळ निधी आला, हिच जलयुक्तची शोकांतिका अन् जिल्ह्याचे वास्तव आहे.शासनस्तरावर मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्याने ड्रिम प्रोजेक्टच्या कामांची चौकशी मुख्यमंत्र्यांनाच लावावी लागली. सन २०१९-२० साठी जलयुक्तचा काहिही गाजावाजा नाही. आता केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाद्वारा आता ‘जलशक्ती अभियान’ १ जुलैपासून सुरू करण्यात आले. यामध्ये अमरावती शहरासह जिल्ह्यातील सर्वाधिक भूजलस्तर खालावलेल्या मोर्शी, वरूड, अचलपूर व चांदूर बाजार या चार तालुक्यांत समावेश करण्यात आला. जलसंधारणासाठी आता पंचसूत्रीचा उतारा केंद्रीय सचिव दुर्गाप्रसाद मिश्रा यांनी दिला आहे. यासाठी अद्यापही निधीची वानवा आहे. त्यामुळे जनजागृतीतून जलजागृतीवर भर दिला जात आहे.चार वर्षांत ७१,४७७ हेक्टर सिंचन कुठे?चार वर्षांत जलयुक्तच्या १६,४६२ कामांमुळे किमान ८३ हजार ११६ टीएमसी जलसाठा निर्माण झाल्याचा जिल्हाधिकाºयांच्या अहवालात नमूद आहे. विशेष म्हणजे हा अहवाल मुख्यमंत्र्यांनाच सादर करण्यात आलेला आहे. जलयुक्तच्या कामामुंळे निर्माण झालेल्या पाणीसाठ्यातून पिकांना एकवेळ पाण्याची पाळी दिल्यास किमान ७१ हजार ४७७ हेक्टरमध्ये सिंचन करता येते, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले. दरवर्षी पावसाअभावी दुष्काळ ओढावला असताना जलयुक्तमुळे ‘सुजलाम्, सूफलाम्’ झालेला शेतकरी समोर आलेला नाही.७५८ गावे जलपरिपूर्ण कशी?जिल्ह्यात सन २०१५-१६ ते २०१७-१८ या कालावधीत ७५८ गावांमध्ये जलयुक्त शिवार हे राज्य शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात आले. यामध्ये १६ हजार १८८ कामे मंजूर झाली. यापैकी १६ हजार १४२ कामे पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाचा आहे. यामुळे ७५८ गावे जलपरिपूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यावर ३१८ कोटी ७८ लाखांचा निधी खर्च झाला. यंदा २९४ गावांमध्ये कामे करण्यात आलीत. यातील १८५ कामे परिपूर्ण झाल्याने गावे जलपरिपूर्ण झाल्याचा यंत्रणेचा दावा किती खरा आहे, हे यंदाच्या स्थितीवरून दिसून येत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार