शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

व-हाडात तीन हजारांवर गावे तहानली!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 5:39 PM

विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झालेल्या पावसाचे ‘साइड इफेक्ट’ आता जाणवायला लागले आहेत. पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३,२२६ गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे.

 - गजानन मोहोड   

अमरावती - विभागात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झालेल्या पावसाचे ‘साइड इफेक्ट’ आता जाणवायला लागले आहेत. पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक खालावल्याने जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत तब्बल ३,२२६ गावांना टंचाईची झळ पोहोचणार आहे. याविषयी विभागीय आयुक्त कार्यालयाने ५,५२९  उपाययोजना प्रस्तावित केल्या. यावर ७९ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.यंदा पावसाळ्यात  ७७७.१ मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ५८१ मिमी पडला. या चार महिन्यात केवळ ३६ दिवस पावसाची नोंद झाली. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यातच निरीक्षण विहिरीतील पाण्याची पातळी ही दोन मीटरपेक्षा अधिक खोल गेली. भूजल सर्वेक्षण विभागाने संभाव्य पाणीटंचाईची स्थिती जिल्हा प्रशासनाला विशद केली. मात्र, सर्वच जिल्हा परिषदांद्वारा हा गंभीर विषय दुर्लक्षित करण्यात आला. त्यामुळेच पाणीटंचाईच्या संभाव्य कृती आराखड्यांना विलंब झाला. विभागीय आयुक्तांनी याविषयी संबंधितांचे कान उपटल्यानंतर तब्बल महिनाभर उशिराने आराखडा तयार करण्यात आला. त्याचा एकत्रित कृती आराखडा गुरुवारी तयार करण्यात आला. विभागात जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान १,९१५ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. यासाठी २६५३ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ३४ कोटी ४५ लाख ७६ हजारांचा निधी खर्च होणार आहे. एप्रिल ते जून या कालावधीत १,३११ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. याचा सामना करण्यास १,६४१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यावर ११ कोटी ५४ लाख ४८ हजारांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये  २६६ गावांतील ४३७ विहिरी खोल करून गाळ काढण्यात येणार आहे. यावर २.४३ कोटी खर्च होतील. २,२८० गावांमध्ये २५१२ खासगी विहिरींच्या अधिग्रहणावर १३.२३ कोटी, ५०३ गावांमध्ये ५२१ टँकरद्वारा पाणीपुरवठ्यावर १८.५८ कोटी, ५३१ गावांमध्ये नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीवर १९.५२ कोटी, ७९ गावांमध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती, १,००७ गावांमध्ये १,१७१ नवीन विंधन विहिरींवर १०.७० कोटी, तर २९७ गावांमध्ये २३७ तात्पुरत्या नळ योजना तयार करण्यासाठी १५.३१ कोटींचा निधी खर्च होणार आहे.टंचाईग्रस्त गावे, उपाययोजना व निधीअमरावती जिल्ह्यात १४२८ गावांसाठी १७४५ उपाययोजनांवर १७.९९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. अकोला जिल्ह्यात ५३४ गावांतील १०८४ उपायोजनांवर २६.८५ कोटी, बुलडाणा जिल्ह्यात ७९७ गावांतील १२१९ उपाययोजनांवर १८.९४ कोटी, यवतमाळ जिल्ह्यात ६७० गावांतील ९०३ उपाययोजनांवर १०.७९ कोटी व वाशिम जिल्ह्यात ५१० गावांसाठी ५७८ उपाययोजनांवर ४.४९ कोटींचा निधी खर्च होणार आहे. विभागातील जलप्रकल्पांमध्येदेखील सरासरी ४२ टक्केच साठा आहे. अकोला जिल्ह्यात ४१ खासगी टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती