शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कापूस गाडीमागे हजारांची लूट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:02 IST

शासनाने यावर्षी हमीभावाने शासकीय कापूस खरेदीला ३ डिसेंबरपासून सुरुवात केली. तालुक्यात शासनाने आतापर्यंत ४ हजार ५०० वाहनांतून १ लाख ६० क्विंटल कापूस खरेदी केला. अंजनगाव सूर्जी तालुक्यात चार खासगी जिनिंग प्रेसिंग केंद्रावर कापूस खरेदी होत आहे. बाजार समितीत वाहन लावण्यापासून ते खाली करण्यापर्यंत शेतकऱ्याला पैसे मोजावे लागतात. या गोरखधंद्यात शेतकरी नाडवला जात आहे.

ठळक मुद्देबाजार समितीतील प्रकार : प्रशासनाची अळीमिळी गुपचिळी

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : राज्य शासनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन डिसेंबर महिन्यात शासकीय कापूस खरेदी सुरू केली. परंतु यात शेतकऱ्यांची प्रचंड लूट होताना दिसून आहे. यात मापाई, उतराई व हलका कापूस संबोधून प्रतिक्विंटल ५०० ती १ हजार रुपयांनी शेतकऱ्यांना गंडविले जात आहे.शासनाने यावर्षी हमीभावाने शासकीय कापूस खरेदीला ३ डिसेंबरपासून सुरुवात केली. तालुक्यात शासनाने आतापर्यंत ४ हजार ५०० वाहनांतून १ लाख ६० क्विंटल कापूस खरेदी केला. अंजनगाव सूर्जी तालुक्यात चार खासगी जिनिंग प्रेसिंग केंद्रावर कापूस खरेदी होत आहे. बाजार समितीत वाहन लावण्यापासून ते खाली करण्यापर्यंत शेतकऱ्याला पैसे मोजावे लागतात. या गोरखधंद्यात शेतकरी नाडवला जात आहे. यासंदर्भात सर्वप्रथम बाजार समितीचे सचिव गजानन नवघरे यांना मापाई आणि तोलाईचे शासकीय भाव विचारले असता त्यांनी आम्हाला स्पष्ट माहिती नसल्याचे सांगितले. कापूस उत्पादक महासंघाचे सरव्यवस्थापक जयेश महाजन यांना मापाई आणि तोलाई संदर्भातील नियमांबाबत विचारणा केली असता त्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अंगुलीनिर्देश केला. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांना विचारणा केली असता, माझ्या स्तरावर याची माहिती नसून फेडरेशनला विचारा, असे त्यांनी सांगितले.राज्य कापूस पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक डी. यू. कांबळे यांचेशी संपर्क केला असता, बाजार समितीला माहिती विचारा, अशी टोलवाटोलवी करण्यात आली. कापूस खरेदी ते गाठी तयार करण्यापर्यंतची जबाबदारी जिनींग प्रेसिंगची आहे. यासंदर्भात तालुका सहायक निबंधकाकडे तक्रार करण्यास सांगितले. जिनिंग मालक, खरेदीदार, काटा तपासणी प्रमाणपत्र याचा फलक कापूस खरेदी केंद्रावर लावणे बंधनकारक आहे. मात्र तसे फलकही कुठे आढळून येत नाही.मनमानी वसुलीमहाराष्ट्र शासन खरेदी करीत असलेल्या लाखो क्विंटल कापूस खरेदी संदर्भात शासनाचे कुठेही नियम ठरले नसून शेतकºयांकडून प्रत्येक वाहनामागे तोलाई ४० ते ५० रुपये, उतराईसाठी ४५० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत रक्कम घेतली जाते. परंतु यासंदर्भात शासनाचे दरपत्रक नसल्याने शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याचे दिसून येत आहे. डी.यू. कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात शासनाकडून कुठलेही निर्देश नाहीत. त्यामुळे शासकीय कापूस खरेदीत कोट्यवधींची काळी उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे. यात जिनिंग प्रेसिंग लॉबी, स्थानिक कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत अनेकांची मिलीभगत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड