शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
3
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
4
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
5
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
6
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
7
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
8
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
9
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
10
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
11
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
12
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
13
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
14
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
15
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
16
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

हजारो क्विंटल शेतमाल पावसात भिजला

By admin | Updated: March 2, 2015 00:31 IST

शनिवारी सायंकाळी ४ वाजता झालेल्या सुसाट वादळासह पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हजारो पोते धान्य भिजले.

इंदल चव्हाण अमरावतीशनिवारी सायंकाळी ४ वाजता झालेल्या सुसाट वादळासह पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हजारो पोते धान्य भिजले. यात तूर, सोयाबीन, हरभरा व इतर धान्याचे प्रचंड नुकसान झाले. याचा फटका शेतकऱ्यांंना बसला आहे. यावर्षी अल्प पावसामुळे कृषिमालाचे उत्पादन अर्ध्यावर आले. त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघाले नाही. त्यातच दर अत्यल्प असल्यामुळे मालाची मागील वर्षीच्या तुलनेत आवक कमीच आहे. मात्र शेतकरी आधीच डबघाईस आलेला असताना शनिवार व रविवारी झालेल्या पावसामुळे जेमतेम विक्रीसाठी आणलेला कृषिमाल ओला झाल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या तूर, सोयाबीन व हरभऱ्याची आवक आहे. यामध्ये तुरीची दररोज २ ते ४ हजार क्विंटल, हरभरा १०० ते २०० क्विंटल व सोयाबीन ५०० ते ७०० क्विंटलची आवक होत आहे. येथे सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत आवक स्वीकारली जाते व खरेदीचे व्यवहार दुपारी ४ वाजेपर्यंत संपुष्टात येते. त्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कृषिमाल ते आपल्या नियोजनानुसार थप्पी लावून ठेवतात; मात्र शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन ६ वाजतापासून विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसला. यामध्ये व्यापाऱ्यांची वेळेवर योग्य उपाययोजना करताना तारांबळ उडाली. तासभर तुफान वादळामुळे मालावरील ताडपत्री उडाल्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांसह व्यापारांनासुद्धा बसला आहे. दरम्यान काही गंजींवर ताडपत्री पडली तर काही गंजी उघड्यावरच राहिल्यात. त्यामुळे जवळपास २ हजार धान्याचे पोते पावसात भिजल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ताडपत्रीची व्यवस्था नाहीशुक्रवारी माल विक्रीला आणला होता. विक्री झाली नसल्यामुळे बाजार समिती आवारात ठेवला होता. अचानक आलेल्या पावसामुळे नियोजन करण्यासाठी धावपळ करावी लागली. कमिटीकडे ताडपत्री मागण्याकरिता गेलो असता संपल्याचे उत्तर मिळाले. काही ताडपत्र्या फाटल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वेळेवर तडजोड होऊ शकली नाही. पणिामी १४ पोते चना पाण्यात ओला झाला. यामध्ये जवळपास ७० हजारांचे नुकसान झाल्याचे वाठोडा शुक्लेश्वर येथील शेतकरीसुनील बुरघाटे यांनी सांगितले.बॉक्सकमिटीने व्यवस्था करायला हवीबाजार समितीचा अवाढव्य व्याप बघता येथे आपात्कालीन परिस्थतीत योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने कमिटीतर्फे व्यवस्था व्हायला हवी. शेतकरी शेतातून आणलेला माल जिवापाड जपतात. माल घरी असताना अशा संकटांचा सामना करताना वाटेल ती उपाययोजना करतात. तेव्हा त्यांचे 'सोर्स' असतात. मात्र बाजार समितीत माल आणल्यानंतर त्याची व्यवस्था करताना त्यांना उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून सुविधा मिळणे गरजेचे आहे, असे मत आडते मनोज राठी यांनी व्यक्त केले.