शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

‘त्या’ नरभक्षक वाघाला जेरबंद करा अथवा ठार मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:42 PM

धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर आणि अंजनसिंगी येथील दोघांना तीन दिवसांत नरभक्षक वाघाने ठार केले. या वाघाला तात्काळ जेरबंद करा अथवा ठार मारा, अन्यथा कायदा हातात घेऊ, असा निर्वाणीचा इशारा आ. वीरेद्र जगताप यांनी शासनाला दिला आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : तर कायदा हातात घेऊ

अमरावती : धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर आणि अंजनसिंगी येथील दोघांना तीन दिवसांत नरभक्षक वाघाने ठार केले. या वाघाला तात्काळ जेरबंद करा अथवा ठार मारा, अन्यथा कायदा हातात घेऊ, असा निर्वाणीचा इशारा आ. वीरेद्र जगताप यांनी शासनाला दिला आहे. वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांना त्यांनी पत्र दिले आहे.तीन दिवसांत दोघांना वाघाने ठार केल्याने धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. हा वाघ किती जणांचे बळी घेणार, असा सवाल विचारू लागले आहेत. त्यामुळे वन विभागाने नरभक्षक वाघाला जेरबंद करावे अथवा ठार मारावे, अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊन वाघाला ठार मारू, अशा धमकीचे पत्र आ. जगताप यांनी शासनाला दिले. शेतीची कामे वाघाच्या दहशतीमुळे पूर्णत: बंद आहेत. आणखी किती दिवस असे गावकऱ्यांनी जगावे, या महत्त्वाच्या प्रश्नाकडे आ. जगताप यांनी लक्ष वेधले. शाळेत मुले जात नाही. महिलांमध्ये भीती आहे. परिसरातील गावकºयांचे जगणे असह्य झाले आहे. प्रसंगी गावकरी कायदा हातात घेऊन त्याला ठार मारतील. धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यात वाघामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच्या वस्तुस्थितीबाबत आ. जगताप यांनी वनसचिवांना अवगत केली. दरम्यान, ग्रामस्थांना वाघासंदर्भात खबरदारी घेण्याचे आवाहन आ. जगताप यांनी केले आहे.