जिल्ह्यात वाढले थायरॉईडचे रूग्ण

By Admin | Updated: October 6, 2015 00:20 IST2015-10-06T00:20:08+5:302015-10-06T00:20:08+5:30

आयोडीनच्या कमतरतेमुळे गळ्याला होणारा आजार म्हणजे थायरॉईड.

Thiroid patients in district | जिल्ह्यात वाढले थायरॉईडचे रूग्ण

जिल्ह्यात वाढले थायरॉईडचे रूग्ण

शंभरातले चार रुग्ण पॉझिटिव्ह : प्रतिबंधात्मक उपायांची गरज
संदीप मानकर अमरावती
आयोडीनच्या कमतरतेमुळे गळ्याला होणारा आजार म्हणजे थायरॉईड. या आजाराच्या प्रमाणात जिल्ह्यात वाढ झाली असून जिल्ह्यात प्रत्येक १०० रुग्णांमागे ४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. या आजारावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी ही माहिती दिली.
शरीरात थायरॉईड ग्रंथी असते. ती टी-३ व टी-४ हार्मोन्स तयार करते. परंतु हार्मोन्स तयार करण्याची ही प्रक्रिया कमी झाल्याने गळ्याभोवती आधी छोट्या गाठी तयार होतात व नंतर गलगंड होतो. हा थायरॉईडचा पुढचा प्रकार आहे. पूर्वी हिमालय पर्वताच्या परिसरात आयोडीनच्या कमतरतेमुळे या आजारांचे रुग्ण आढळत होते. आता ग्रामीण भागातही हा आजार फोफावला आहे. ४० ते ५० वर्षे वयोगटातील रुग्णांना साधारणत: हा आजार होतो. पण, अलिकडच्या काळात तरुणांनाही या आजाराने घेरले आहे.

थायरॉईडची लक्षणे
लठ्ठपणा, वजन कमी होणे, घाबरणे किंवा कंप सुटणे, थकवा, नैराश्य, गळ्याभोवती सूज येणे, आवाज घोगरा होणे, थंडी किंवा गरमी सहन न होणे तसेच स्त्रियांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता ही आजाराची लक्षणे आहेत.

रक्त चाचण्यांमधून आजाराचे निदान
टी-३, टी-४ तसेच टी.एस.एच. या रक्ताच्या चाचण्या केल्यानंतर या आजाराचे निदान होते. पॅथॉलॉजी किंवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे गरजेचे आहे.

१०० रुग्णांमागे २ ते ४ रुग्ण १०० रुग्णांमागे २ ते ४ रुग्ण थायरॉईड या आजाराने पॉझिटिव्ह आढळत आहेत. योग्य वेळी उपचार केल्यास हा आजार बरा होतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. हा आजार अनुवंशिकही असू शकतो.
- प्रवीण बिजवे, चिकित्सक.

थॉयरॉईडच्या आजारावर रुग्णांना होमिओपॅथी पध्दतीने उपचार केले जातात. अलीकडेच नि:शुल्क थायरॉईड उपचार शिबिर घेण्यात आले आहे.
- मोईन परवेज,
एम.डी. (होमिओपॅथी).

Web Title: Thiroid patients in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.