शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

'लिफ्ट' देणे पडले महागात; युवकाचे हातपाय बांधून पळवली दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 15:11 IST

लिफ्ट देणे खानापूर येथील युवकाला चांगलेच महागात पडले. त्याच्या दुचाकीसह मोबाईल व रोकड हिसकावून अनोळखी इसमांनी धूम ठोकली. एवढेच नव्हे तर त्याच्याच खांद्यावरील दुपट्ट्याने हातपाय बांधून त्याला गप्प बसविले.

अमरावती : दुचाकीने जात असताना वाटेत कुणी मदत मागितली तर, सहकार्याची भावना ठेवत आपण लिफ्ट देत माणूसकी पाळतच असतो. परंतु, एका दुचाकीस्वाराला हेच महागात पडले आहे. चोरट्यांनी त्याच्या दुचाकीसह मोबाईल व रोकड हिसकावून अनोळखी इसमांनी पळ काढला. एवढेच नव्हे तर त्याच्याच खांद्यावरील दुपट्ट्याने हातपाय बांधून त्याला गप्प बसविले.

खानापूर येथील बाबा ऊर्फ अतुल गुलाबराव ठाकरे (३६) हे ७ ऑक्टोबर रोजी जाण्याकरिता अतुल यांनी मदतनीस पंकजसिंह कुमार यांची दुचाकी घेतली. कृषी उत्पन्न बाजार समिती समोरून रात्री ११ च्या सुमारास जात असताना दोन अनोळखी इसमांनी हात दाखवून थांबविले आणि संत्रा मंडीपर्यंत सोडून देण्यास सांगितले. त्याने दोघांनाही मागे बसवून घेतले.

जयस्तंभ चौक मार्गे चांदूर बाजार रोडने रेल्वे क्रॉसिंगच्या पुढे काही अंतरावर दोघांपैकी एकाने अतुलला धक्का दिला. गाडी थांबवताच त्यांनी अतुलच्या गळ्यातील दुपट्टा काढून त्याचे हातपाय बांधले आणि खिशातील ७०० रुपये, आठ हजारांचा मोबाईल आणि दुचाकी असा ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी याप्रकरणी ८ ऑक्टोबर रोजी गुन्हा नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbikeबाईकtheftचोरी