शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

'ते' रोडरोमिओ पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:50 IST

भरदिवसा पायी जाणाऱ्या तरुणींची छेडखानी करणारे दोन रोडरोमिओ अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले. फे्रजरपुरा व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना हुडकून काढले असून, पोलिसांच्या या संवेदनशील व तत्पर कारवाईची राज्यभरात चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देछेडखानीचा व्हिडीओ : पोलिसांनी तातडीने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भरदिवसा पायी जाणाऱ्या तरुणींची छेडखानी करणारे दोन रोडरोमिओ अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडले. फे्रजरपुरा व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना हुडकून काढले असून, पोलिसांच्या या संवेदनशील व तत्पर कारवाईची राज्यभरात चर्चा सुरू आहे.पोलीस सूत्रानुसार, सुरज भगवान पंडित (२०) व एक अल्पवयीन (दोन्ही राहणार आशियाना क्लबमागे, वडाळी परिसर) अशी आरोपींची नावे आहेत. पायी जाणाºया मुलींची छेड काढत असलेले व्हिडीओ शहरातील एका सुजाण नागरिकाने काढला. याच व्हिडीओच्या आधारे ‘लोकमत’ने लोकदरबारी सविस्तर वृत्त मांडले सोबतच तो व्हिडीओ ‘लोकमत’च्या वेबसाइटवर अपलोड केला. राज्यासह देशभरात तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी संवेदनशीलपणे तपासकार्य सुरू केले होते. त्या रोडरोमिओंच्या दुचाकी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी आरोपी निष्पन्न केले. ती दुचाकी देविदास देवरे नामक व्यक्तीच्या नावे असून, त्यांनी ती दुचाकी हंसराज खडसे यांना विक्री केली. त्यानंतर ती दुचाकी एक गॅरेज चालविणाºया व्यक्तीने विकत घेतली. त्याच्याकडून ती दुचाकी आरोपी १७ वर्षीय मुलीने खरेदी केल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे. त्यानंतर पोलिसांनी सगळीकडून तपासाची सूत्रे हलवून दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने पकडले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राम गिते यांच्या पथकातील पोलीस शिपाई श्याम, विनय, सुभाष, राजूआप्पा, इंद्रजित यांनी दुचाकी चालविणारा बिच्छुटेकडीतील रहिवासी त्या १७ वर्षीय तरुणाचा शोध घेऊन त्याला मंगळवारी उशिरा रात्री ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे दुचाकीवर मागे बसून मुलींचा दुपट्टा ओढणाºया सूरज पंडितला फे्रजरपुराचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या पथकातील शिपाई अमोल मनोहर, सतीश विघे, दिनेश जवंजाळ यांनी बुधवारी सकाळी अटक केली. पोलिसांनी त्यांंची दुचाकी जप्त केली आहे. त्यांची पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमक्ष पेशी करण्यात आली. दोघांचीही कानउघाडणी करून त्यांनी सक्त ताकीद दिली. या प्रकरणात दोन्ही आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३५४, ३५४(ब) (विनयभंग), ३३६, ३४१ (अडवणूक करणे), आरडब्ल्यू ५/१८० (दुसºयाची दुचाकी चालविणे), ३/१८१(परवाना नसणे) व १३०, १७७ (वाहनाचे दस्तावेज नसणे) अन्वये गुन्हा नोंदविला आहे.तीन मुलींची काढली छेडसूरज पंडित व १७ वर्षीय अल्पवयीन दुचाकी क्रमांक एमएच ३१ क्यू ७७९७ ने पंचवटीकडून चपराशीपुºयाकडे जात होते. अल्पवयीन दुचाकी चालवीत होता. सूरजने मागील सीटवरून पंचवटी चौकात प्रथम एका मुलीची छेड काढली. त्यानंतर पुढे बियाणी चौकात छेड काढली. हा प्रकार एका चारचाकी वाहनातील तरुणाने कॅमेºयात कैद केला व पाठलाग केला. त्यावेळी सूरजने चपराशीपुरा चौफुलीवर आणखी एका मुलीची छेड काढली.व्हिडीओ काढणाऱ्यास बक्षीस देणारमुलींच्या छेडखानीचा व्हिडीओ काढणाऱ्याने कर्तव्यदक्ष नागरिकाची भूमिका बजावली आहे. त्यांचे हे कार्य समाजापुढे आदर्श निर्माण करणारे आहे. त्या व्यक्तीने रोडरोमिओंचे छेडखानीचे कृत्य उघड केले आहे. सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या त्या व्यक्तीचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी कौतुक केले. त्या व्यक्तीला बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे.छेडखानी करणाऱ्यांची माहिती द्या‘लोकमत’ने छेडखानीचा तो व्हिडीओ व्हायरल केल्याने पोलिसांना आरोपी हुडकून काढणे सोपे झाले. समाजात अशा घटना बहुदा उजेडातच येत नाही. अशा प्रकारच्या कृत्यांवर नागरिकांनीही लक्ष असू द्यावे. अश्लील वा समाजविघातक कृत्य कोणीही करताना आढळून येत असेल, तर तत्काळ पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याशी थेट संपर्क करता येऊ शकते. याशिवाय पोलिसांच्या १०० किंवा ०७१२-२५५१००० या क्रमांकावर संपर्क साधून संबंधित व्यक्ती माहिती देऊ शकते.मुलींच्या छेडखानी प्रकरणात दोघांना अटक केली असून, त्यांची दुचाकी जप्त केली आहे. अशाप्रकारचे कृत्य करणाºयांची माहिती नागरिकांनी कळवावी.- दत्तात्रय मंडलिकपोलीस आयुक्त