निवडणूक कामात हयगय खपविली जाणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:01 IST2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:01:02+5:30
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्र अधिकाऱ्यांची कार्यशाळा नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर आदी यावेळी उपस्थित होते.

निवडणूक कामात हयगय खपविली जाणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निवडणूक प्रक्रियेत आयोगाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. यामध्ये कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. निवडणूक आयोगाने प्रत्येक प्रक्रियेबाबत सविस्तर व सुस्पष्ट मार्गदर्शन विविध आदेश व सूचनांद्वारे केले आहे. त्यामुळे त्याचे तंतोतंत पालन करावे. त्यात काहीही बदल किंवा शॉर्टकट वापरू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी दिले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्र अधिकाऱ्यांची कार्यशाळा नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर आदी यावेळी उपस्थित होते. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिटचे कार्य, मॉकपोल यांसह निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक विविध बाबींची उजळणी या कार्यशाळेत करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी यावेळी मार्गदर्शन केले आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅट याबाबत प्रात्यक्षिकही अधिकारी व कर्मचाºयांकडून करून घेतले.
निवडणुकीच्या अनुषंगाने सादर करावयाची आकडेवारी काटेकोर असावी. ती वेळोवेळी तपासून घ्यावी. ईव्हीएम यंत्रणेच्या सुरक्षेसाठी संपूर्ण दक्षता घ्यावी. निवडणूकीच्या कामात एकही त्रुटी राहता कामा नये, असे निर्देश शैलेश नवाल यांनी येथे दिले. गत लोकसभा निवडणुकीत सर्वांनी चांगले काम करून उत्तमरीत्या प्रक्रिया पार पाडली. याही निवडणुकीत सर्वांनी समन्वयाने काम करून प्रक्रिया पार पाडावी, २असे आवाहनही त्यांनी केले.
सुमारे २७५ क्षेत्र अधिकाºयांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. संपूर्ण प्रक्रियेबाबत क्षेत्र अधिकाºयांनी घ्यावयाच्या दक्षता व जबाबदारीबाबत माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी दिली.
तिवस्याचे आरओ नरेंद्र फुलझेले हे जिल्ह्यासाठी मास्टर ट्रेनर आहेत. दरम्यान, मनुष्यबळाची डेटा एंट्री सुरू आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाºयांना तीन वेळा प्रशिक्षण दिले जाईल.