धम्मकार्यासाठी कोणत्याही न्यायालयाची अडचण नाही
By Admin | Updated: December 24, 2015 00:16 IST2015-12-24T00:16:38+5:302015-12-24T00:16:38+5:30
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांचे पुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांनीच भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून देशभर धम्मदीक्षेचे कार्यक्रम आयोजित केले.

धम्मकार्यासाठी कोणत्याही न्यायालयाची अडचण नाही
भीमराव आंबेडकरांचे प्रतिपादन : दर्यापुरात जाहीर सभा
दर्यापूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांचे पुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांनीच भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून देशभर धम्मदीक्षेचे कार्यक्रम आयोजित केले. काही निकाल जरी न्यायालयाचे महासभेच्या विरोधात गेले असले तरी धम्मकार्य करण्यासाठी कोणत्याही न्यायालयाची अडचण येणार नाही, असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व्दितीय नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले. ते दर्यापूर येथे आयोजित सभेत बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, न्यायालयीन निकालाचा आदर आहे. पण तरीही धम्म कार्य करून सुसंस्कार समाज निर्मितीच्या कार्यास कुणीही थांबू शकणार नाही. त्यासाठी कोणत्याही न्यायालयाची अनुमतीची गरज नसून भगवान बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमाणसात रुजविण्यासाठी अहोरात्र कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय बौध्द महासभा दर्यापूर शाखेच्यावतीने रविवारी स्थानिक जिल्हा परिषदेच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी विजय जामनिक होते. प्रमुख अतिथी म्हणून एम.डी. सरोदे, रवी भगत, एम.पी. वालोंद्रे, विजय चोरपगार, लक्ष्मी सराटे, शोभा वानखडे, राहुल आठवले, संतोष कोल्हे, पी.टी. खंडारे, एम.पी. निताळे, बुध्दाजी रायबोले, नरेंद्र जामनिक, आर.एम. भट्टड आदींची उपस्थिती होती.
यावेळी एम.डी. सरोदे व रवी भगत यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी बोलताना विजय चोरपगार म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म चळवळ वाढविण्यासाठी मोलाचे कार्य केले. आज त्यांचा विचार घेऊन आम्ही चालत आहे.
संचालन एस.एस.डोंगरे, प्रास्ताविक विजय चोरपगार व आभार मुरलीधर रायबोले यांनी मानले. सभेला असंख्य आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)