राष्ट्रसंतांच्या छायाचित्रासाठी शासकीय कार्यालयांत जागा नाही

By Admin | Updated: September 17, 2014 23:28 IST2014-09-17T23:28:02+5:302014-09-17T23:28:02+5:30

युध्दजन्य स्थितीत देशाच्या सीमेवर जाऊन भजनांद्वारे सैनिकांचे मनोबल वाढविणारे जगाला ग्रामोध्दाराचा मंत्र देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव थोर पुरुष व राष्ट्रसंतांच्या यादीत समाविष्ट करण्यास

There is no place for Government Offices for National Film | राष्ट्रसंतांच्या छायाचित्रासाठी शासकीय कार्यालयांत जागा नाही

राष्ट्रसंतांच्या छायाचित्रासाठी शासकीय कार्यालयांत जागा नाही

गजानन मोहोड - अमरावती
युध्दजन्य स्थितीत देशाच्या सीमेवर जाऊन भजनांद्वारे सैनिकांचे मनोबल वाढविणारे जगाला ग्रामोध्दाराचा मंत्र देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव थोर पुरुष व राष्ट्रसंतांच्या यादीत समाविष्ट करण्यास शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नकार दिला आहे. सद्यस्थितीत या यादीमध्ये २८ थोरपुरुष व राष्ट्रपुरुषांचा समावेश आहे. ही संख्या विचारात घेता आणखी छायाचित्र लावण्यासाठी शासकीय कार्यालयात जागेचा प्रश्न निर्माण होईल, असे उत्तर शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहे. दोन वर्षांपासून धूळखात असलेल्या प्रस्तावावर मिळालेल्या अशा अफलातून उत्तरामुळे गुरुदेव भक्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
पुण्यतिथी पर्वात ठरणार धोरण
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव गुरूकुंज (मोझरी) येथे ७ ते १४ आॅक्टोबर २०१४ दरम्यान साजरा होणार आहे. यावेळी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो गुरुदेवभक्त राष्ट्रसंतांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी येथे जमतात. यावेळी गुरुदेवभक्तांच्या भावना जाणून घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे गुरुदेव सेवा मंडळाचे राजाराम बोथे यांनी सांगितले.
असे म्हणाले शासन
विभागीय आयुक्तांनी ३१/१०/२०१२ च्या पत्रान्वये सरचिटणीस, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, मोझरी यांच्या २९/१०/२०१२ च्या निवेदनाच्या अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत समाविष्ट करण्याबाबत तसेच त्यांचे छायाचित्र शासकीय कार्यालयांत लावण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यावर विभागीय आयुक्तांनी सद्यस्थितीत २८ थोर पुरुष व राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे लावण्याची परवानगी आहे. ही संख्या लक्षात घेता त्यात वाढ करता येत नाही. तसेच सदर संख्या विचारात घेता फोटो लावण्यासाठी कार्यालयात जागेचादेखील प्रश्न निर्माण होतो. यामुळे गुरूदेवभक्तांची विनंती मान्य करता येत नसल्याचे सांगितले.

Web Title: There is no place for Government Offices for National Film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.