मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपर्यंत एलबीटीचे 'असिसमेंट' नाही
By Admin | Updated: August 2, 2014 23:51 IST2014-08-02T23:51:37+5:302014-08-02T23:51:37+5:30
स्थानिक संस्था कर (एलबीटी) बाबत तोडगा काढण्यासंदर्भात मुख्यंमत्र्यांची बैठक होईपर्यंत व्यावसायिकांची कर मूल्य निर्धारण (असिसमेंट) होणार नाही, अशी घोषणा राज्याचे नगरविकास राज्य मंत्री उदय सावंत

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपर्यंत एलबीटीचे 'असिसमेंट' नाही
अमरावती : स्थानिक संस्था कर (एलबीटी) बाबत तोडगा काढण्यासंदर्भात मुख्यंमत्र्यांची बैठक होईपर्यंत व्यावसायिकांची कर मूल्य निर्धारण (असिसमेंट) होणार नाही, अशी घोषणा राज्याचे नगरविकास राज्य मंत्री उदय सावंत यांनी शुक्रवारी येथे केली. या घोषणेमुळे स्थानिक व्यावसायिकांना एलबीटीच्या असिसमेंटपासून तूर्तास दिलासा मिळाला आहे.
महापालिकेत एसएमएसने मालमत्ता धारकांना माहिती प्रणालीच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर आ. रावसाहेब शेखावत, आ. रवी राणा, महापौर वंदना कंगाले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे, उपमहापौर नंदकिशोर वऱ्हाडे, स्थायी समिती सभापती मिलिंंद बांबल, आयुक्त अरुण डोंगरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना उदय सावंत म्हणाले, अन्य महापालिकेच्या तुलनेत अमरावतीत एलबीटीबाबत व्यापारी आणि प्रशासनात समन्वय आहे. एलबीटीबाबत काही उणिवा असल्याच्या तक्रारी व्यावसायिकांच्या आहेत. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत विशेष बैठक लावून एलबीटीविषयी त्रुट्या दूर केल्या जाईल. दरम्यान ही बैठक होईपर्यंत प्रशासनाने व्यावसायिकांचे एलबीटीविषयी असिसमेंट होणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली.