शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

रेती वाहतूक प्रकरणात १३ टॅ्रक्टरवर कारवाई नाही

By admin | Updated: August 9, 2015 00:31 IST

तालुक्यात एक महिन्यापूर्वी देऊतवाडा रेतीघाटावर तहसीलदार आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १६ रेती ट्रॅक्टर पकडून पंचनामे केले.

मंडळ अधिकारी निलंबित : अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोषवरुड : तालुक्यात एक महिन्यापूर्वी देऊतवाडा रेतीघाटावर तहसीलदार आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १६ रेती ट्रॅक्टर पकडून पंचनामे केले. परंतु परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलिसांनासुध्दा पाचारण करण्यात आले. ऐनवेळी तहसीलदार घटनास्थळाहून निघून गेल्यावर महसूल कर्मचारी आणि रेती वाहतूकदारांमध्ये वाद झाला. तेथून टॅ्रक्टरचालकांनी रेती टाकून पळ काढला होता. पंचनामे करुनही कारवाई झाली नाही, हे विशेष . देऊतवाडा रेतीघाट १ आणि २ चा लिलाव झाल्याने येथूनच रेती विकली जाते. रेतीमाफियांनी हीच संधी साधून लिलाव न झालेल्या रेतीघाटालासुध्दा सुरुंग लावून लाखो रुपयांची रेती अवैध खनन करून विकल्याची चर्चा आहे. महसूल आणि पोलिसांचे चांगलेच हात ओले झाल्याची चर्चार् तालुक्यात सुरू होती. देऊतवाडा रेती घाट क्रमांक २ च्या रॉयल्टी पासेसवर देऊतवाडा १ मधून रेतीची सर्रास तस्करी सुरु असल्याने महसूल विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. यावरुन तहसीलदार बाळासाहेब तिडके यांनी गत ८ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान रेती घाटावर धाड टाकली. यावेळी १३ टॅ्रक्टरमधून रेतीची वाहतूक करताना रंगेहात पकडले. टॅ्रक्टरचा पंचनामा मंडळ अधिकारी एस.पी. आंडे, तलाठी व्ही.एस. बूचडे, एस.टी. सिडाम, सी.एस सुलताने, डी.बी.मेश्राम, ए.एस.चेरडे यांनी केला व महसूल अधिकाऱ्यांना पाठविला. पंचनामे केलेल्या टॅ्रक्टरविरुध्द दंडात्मक कारवाई केली नाही. तहसीलदार बाळासाहेब तिडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गदर्शन मागितले असल्याचे सांगितले. परिसराचे मंडळ अधिकारी आंडे यांच्यावर अनेक आरोप असल्याने निलंबनाची कारवाई केल्याचे तहसीलदार बाळासाहेब तिडके यांनी सांगितले. मंडळ अधिकाऱ्यांचा नाहक बळी मागील महिन्यात देऊतवाडा घाटावर १३ टॅ्रक्टरचा जप्ती पंचनामा करुन सदर वाहने तहसील कार्यालयात आणण्यासाठी तहसीलदार सूचना देऊन घटनास्थळावरून निघून गेले. मात्र, रेतीमाफियांच्या दादागिरीसमोर मंडळ अधिकारी आणि कर्मचारी काय करणार, हा प्रश्न होता. सदर प्रकरणात अधिकाऱ्यांनी स्वत:च्या उपस्थितीत ट्रॅक्टर आणून दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. उलट या प्रकरणात मंडळ अधिकाऱ्यांवर नाहक कारवाई झाली. तहसीलदारांनी संरक्षणासाठी पोलिसांना पाचारण केले होते काय, असा सवालसुध्दा त्यांना विचारण्यात आला, हा चर्चेचा विषय आहे.