शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

काय सांगता? चिखलदऱ्यात 28 दिवसांपासून सूर्यदर्शनच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 09:13 IST

विदर्भाचे नंदनवन, मेळघाटचे काश्मीर अशा एक ना अनेक नावाने ओळख असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर कधी चेरापुंजीची आठवण करून देणारा, तर क्षणात तुषार कोसळणारा पाऊस पडत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा (जि. अमरावती) : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर मागील २८ दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नाही. पावसाने  एक हजार मिलिमीटरचा आकडा गाठला असून, जून, जुलै या दोन महिन्यांत लाखांवर पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे नगरपालिकेला रग्गड महसूल प्राप्त झाला आहे. कधी मुसळधार, तर कधी रिमझिम कोसळणाऱ्या पावसाने पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे कोसळू लागले आहेत. पांढरे शुभ्र दाट धुके त्यात हे स्वर्ग हरवल्याचे दृश्य मोहीत करणारे ठरले आहे.

विदर्भाचे नंदनवन, मेळघाटचे काश्मीर अशा एक ना अनेक नावाने ओळख असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर कधी चेरापुंजीची आठवण करून देणारा, तर क्षणात तुषार कोसळणारा पाऊस पडत आहे. त्यात चिंब होण्यासाठी वीकेंडसह इतर दिवसही पर्यटक गर्दी करीत आहेत. शेकडो फूट उंचावरून कोसळणारे धबधबे आणि हिरवा गालिचा पांघरलेल्या गगनचुंबी टेकड्या पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडतात.पावसाने हो-नाही म्हणता उशिरा लावलेली हजेरी पाहता, आता थांबता थांबेना म्हणायची वेळ चिखलदरावासीयांवर आली आहे. २८ दिवसांत एकदाही सूर्यदर्शन झाले नसल्याने, दररोजच्या वापराचे कपडेही वाळत नसल्याने स्थानिक नागरिकही कंटाळले आहेत. उबदार कपडे आणि शेकोटीवजा चुलीवर ऊब घेत आहेत.  पर्यटकांसाठी ती पर्वणी ठरत आहे. 

एक हजार मिमी पावसाची नोंदचिखलदऱ्यात आतापर्यंत कोसळलेल्या एकूण पावसाने एक हजार मिलिमीटरचा टप्पा गाठला आहे. त्यामध्ये १० जून ६५ मिमी, १० व १३ जुलै  प्रत्येकी ७९ मिमी, १८ जुलै ८५ मिमी,१९ जुलै ९५ मिमी, तर २५ जुलै ७० मिमी अशी पावसाची नोंद आहे.चिखलदरात २८ दिवसांपेक्षा अधिक काळापासून सूर्याचे दर्शन झाले नाही. सततचा पाऊस, दाट धुके आणि ढगाळ वातावरण आहे. पावसामुळे परिसर गारठला आहे. - अरुण तायडे, सभापती, न. प., चिखलदरा

टॅग्स :ChikhaldaraचिखलदराRainपाऊसAmravatiअमरावती