शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

निधी नाही, योजनांनाही कात्री कशी मिळणार विकासाची खात्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 15:18 IST

कामे ठप्प : कृषी, समाजकल्याण, पशुसंवर्धन विभाग नामधारी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्हा परिषदेतील समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन या विभागांचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. गत काही वर्षांत या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजना टप्प्याटप्प्याने बंद केल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे दोन चार योजनाच शिल्लक आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे सध्या दलितवस्ती सुधार योजनेशिवाय अन्य फारशी कामे नाहीत. योजनेची बहुतांश उद्दिष्ट्येही पूर्ण झाल्याने अनेकदा निधी परत गेला आहे. या कार्यालयात जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या कर्मचाऱ्यांची संख्याही नाही बरोबर आहे. ज्येष्ठ कलाकारांना निवृत्तीवेतन योजनेची जबाबदारी या विभागाकडून काढून पंचायत विभागाकडे दिली. डेप्युटी सीईओ संवर्गाने ती अद्याप स्वीकारली नसल्याने तिचे अडचणी कायम आहेत. 

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या योजना पाच कोटींपर्यतच मर्यादित आहेत. त्यापेक्षा जास्त खर्चाच्या योजना मजीप्राकडे जातात. ग्रामीण विकास यंत्रणेचे कामकाजही स्वतंत्र आहे. वित्त आयोगापासूनही जिल्हा परिषदेला दूरच ठेवले आहे. सर्व निधी थेट ग्रामपंचायतींना जातो. पदाधिकाऱ्यांच्या अवघ्या १० टक्के वाट्यावर समाधान मानावे लागत आहे. जिल्हा परिषदेचे स्वतःचे अंदाजपत्रक २५ कोटींच्या आतच आहे. उर्वरित सर्व निधी नियोजन समिती, आमदार खासदार निधी किंवा अन्य मार्गांनीच मिळवावा लागतो. या स्थितीत जिल्हा परिषदेला निधी नाही. त्यातच योजनांनाही कात्री, परिणामी कशी मिळणार विकासकामांची खात्री, अशी गत मिनी मंत्रालयाची झाली आहे.

पशुसंवर्धन, कृषीची अवस्थाही वाईटजिल्हा परिषदेतील कृषी आणि पशुसंवर्धन विभागांची परिस्थितीही बिकट आहे. पुरेशा योजना नाहीत, त्यामुळे निधीही नाही अशी परिस्थिती या विभागाची आहे. कृषी विभागाच्या बहुतांश योजना राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे सोपविल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांतील कृषी विभागात सध्या सन्नाटा असतो.

बांधकाम विभागही त्याच मार्गावरजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची वाटचालही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. बहुतांश रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाले आहेत. आमदार, खासदारांनाही आपल्या निधीतील कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत करून घेण्यात कल नाही.

शासनाने बळ देण्याची आवश्यकता"गत दहा वर्षांत जिल्हा परिषदेचे महत्त्व कमी करण्याचे काम सुरू आहे. सदस्य होण्याऐवजी गावाचा सरपंच होणे चांगले, अशी मानसिकता तयार झाली आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचा गाडा सुरळीत ठेवण्यासाठी जि.प.ला शासनाने बळ देण्याची गरज आहे."- बाळासाहेब भागवत, माजी उपाध्यक्ष, जि.प.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAmravatiअमरावती