शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांचा पत्ता नाही, वृक्ष लागवड केव्हा? अभिसरणमुळे वन विभागाचे 'कल्याण'

By गणेश वासनिक | Updated: June 24, 2025 15:47 IST

Amravati : दहा कोटी वृक्ष लावगडीचे नियोजन शून्य, वन विभागाला अभिसरण रोहयोतून राबविण्याचे निर्देश

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करायची आहे. त्याकरिता विविध विभागावर जबाबदारी सोपवली आहे. वन विभाग वगळता अन्य विभागाला राज्य निधी मिळणार आहे. पावसाळा सुरू झाला असताना कुठेच खड्डे खोदण्यात आले नाही. त्यामुळे वृक्ष लागवड केव्हा करणार हा प्रश्न यंत्रणेपुढे कायम आहे. एकंदरीत वन विभागाचे अभिसरण योजनेमुळे 'कल्याण’ होणार असल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी हरित समृद्ध महाराष्ट्र करण्यासाठी २६ विभागांना १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यात सर्वाधिक ४ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट रेशीम विभागाला देत वन विभागाने आपल्या अंगावरील घोगडं झटकले आहे. खरे तर १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सहजतेने वन विभाग पूर्ण करू शकले असते. मात्र, आयएफएस लॉबीने केवळ दोन कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट का घेतले, हा संशोधनाचा विषय आहे. मात्र हे दोन कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट अभिसरण योजनेतून पूर्ण करायचे असल्याने अद्यापही खड्डे खोदण्याचे काम ठप्प आहे, हेच सर्वदूर चित्र आहे. 

वन विभागात के.के. पुन्हा सक्रियवन विभागात के.के. पुन्हा सक्रिय झाले असून, वन सचिवांची दिशाभूल करून वन विभागात रोहयो आणि अभिसरण योजनेतून दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचे ठरविले आहे. या निर्णयाला सध्या वन विभागात विरोध होत असून, मुख्यमंत्र्यांचे हरित महाराष्ट्राचे स्वप्न तर भंगणार नाही ना? असे दिसून येत आहे. इतर विभाग वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हे राज्य योजना निधीतून करत असताना वन विभागाला मात्र अभिसरण योजनेतून दोन कोटी वृक्ष लागवडीचा अट्टाहास के.के. यांनी चालविला आहे.

मंत्रालयातून अभिसरण योजनेवर शिक्कामोर्तब२६ विभागांकडे १० कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट देताना वन विभाग वगळता अन्य विभागांना राज्य योजनेतून निधी मिळणार आहे. वृक्ष लागवडीचे टार्गेट पूर्ण करताना राज्य योजनेतून वन विभागाला डावलले आहे. नियोजन विभागाच्या कक्ष अधिकारी वैशाली नायर यांनी १९ जून रोजी परिपत्रक जारी करून वन विभागाने दोन कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट अभिसरण योजनेतून करावे, असे स्पष्ट केले आहे. त्याकरिता ग्रामपंचायतीतून मजुरांची मागणी, आराखडा तयार करावा, असे नमूद आहे.

ग्रामीण भागात शेती कामे, मजूर मिळेनासध्या पावसाळा सुरू झाला असून, शेती कामांनी वेग घेतला आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी २७२ रुपये दराने ग्रामीण भागात मजूरउपलब्ध होईल का? असा सवाल वन कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे वन विभागात तूर्त वृक्ष लागवडीचे नियोजन ढेपाळल्याचे वास्तव आहे.

टॅग्स :Amravatiअमरावतीforest departmentवनविभाग