लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिला सशक्तीकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी, याकरिता सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारकडून 'लखपती दीदी' ही योजना राबवली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार २३४ महिला बचत गटांच्या माध्यमातून उमेद अभियानांतर्गत यंदा जिल्ह्यासाठी ८३ हजार २७२ एवढे उद्दिष्ट शासनाकडून दिले होते. त्यापैकी आतापर्यंत ७८ हजार ७११ महिला लखपती झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बचत गटांसोबत काम करणाऱ्या महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ घेता येणार आहे.
१७४६ बचतगटजिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये आतापर्यंत २२ हजार २३४ एवढी बचत गटांची संख्या आहे. या बचत गटांमध्ये २ लाख १३ हजार ८२२ इतक्या महिला सदस्य कार्यरत आहेत.
७८७११ जिल्ह्यांत लखपती दीदी जिल्ह्याला ८३ हजार २७१ उद्दिष्ट आहे. त्यापैकी आजघडीला ग्रामीण भागात सुमारे ७८७११ लखपती दीदी आहेत
गेल्या वर्षी किती कर्जवाटपउमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांना व्यवसायांकरिता विविध बँकांच्या माध्यमातून आतापर्यंत २२२३४ महिला बचत गटांना ३२२ कोटी २६ लाख २१ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे.
२२,००० जिल्ह्यात २२२३४ इतकी बचत गटांची संख्या आहे. या बचत गटांच्या माध्यमातून लाखो महिलांना एकत्र आणण्याचे काम जिल्हा परिषदेच्या उमेद अभियानाने यशस्वीपणे केले आहे.
महिलांना मिळतो रोजगारउमेद अभियानाच्या माध्यमातून या महिला मसाले, पापड, लोणचे यांसह अनेक खाद्यपदार्थाची निर्मिती करत आहेत. यामुळे रोजगार मिळाला आहे.
"रोजगार अन् स्वयंरोजगारांना नवी मोर्शी वाट शोधून उत्तुंग भरारी घेण्यासाठी महिलासुद्धा आता सर्वच क्षेत्रांत अग्रेसर आहे. उमेद अभियान प्रेरक बनले आहे."- प्रीती देशमुख, प्रकल्प संचालक,
"बचत गटामुळे बचतीची सवय पडली. उमेद अभियानाव्दारे बँकेमार्फत कर्जही मिळाले. यामुळे ग्रामीण भागात महिला बचत गटांना व्यवसायामुळे रोजगार मिळाला."- विमल मेश्राम, महिला बचत सदस्या
"बचत गटाला मिळालेल्या कर्जातून गटातील सर्व महिलांनी मिळून रोजगार सुरू केला आहे. कुटुंबालाही मदत झाली."- प्रभा मानकर, महिला बचत सदस्या
बचत गट, लखपती दीदीतालुका बचत गट लखपती दीदी उद्दिष्टअचलपूर २२५२ ७७९४अमरावती १४१९ ५६३४अंजनगाव १३५१ ५२४१भातकुली १३५८ ५३२३चांदूर रे. १२७८ २८३८चांदूर बा. २०८४ ८१९१चिखलदरा ९६८ ३६५०दर्यापूर १७२४ ६४९८धामणगाव १६८५ ६४१३धारणी १५८५ ४९२६मोर्शी १९३२ ७३१९नांदगाव १६०७ ६०९४तिवसा १२४५ ४९०७वरुड १७४६ ६६४०