बसस्थानकावर व्हीलचेअरच नाही; ज्येष्ठांसह अपंगांची कसरतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:22 IST2021-02-05T05:22:09+5:302021-02-05T05:22:09+5:30
अमरावती : राज्यातील काही आगारांमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सोेयीसाठी व्हीलचेअर ठेवण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील एकाही आगारात ही ...

बसस्थानकावर व्हीलचेअरच नाही; ज्येष्ठांसह अपंगांची कसरतच!
अमरावती : राज्यातील काही आगारांमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सोेयीसाठी व्हीलचेअर ठेवण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील एकाही आगारात ही व्यवस्था नसल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ व्यक्तींना बसमध्ये चढताना कसरत करावी लागत आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहनाच्या स्थानकावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांकरिता 'व्हीलचेअर' आणि इतर सोइसुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिव्यांग व्यक्तींना बसमध्ये सहज चढता - उतरता यावे, याकरिता 'व्हीलचेअर' व इतर व्यवस्था करायला हवी. याशिवाय अपंग व्यक्तीकरिता प्रसाधनगृहात कमाेड शौचालय असायला हवे. बस स्थानकावर दिव्यांग व्यक्ती करीता 'व्हीलचेअर' असणे गरजेचे आहे. मात्र, यापैकी एकही सुविधा अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावर उपलब्ध नसल्याचे दिसून आले. अपंगांना बसमध्ये चढण्याकरिता चालक - वाहकांकडून मदतीचा हात दिला जात नाही.
कोड
अपंगांकरिता बसस्थानकावर वेगळी सुविधा असावी, काय- काय सूविधा आहे याचे सूचना फलक लावायला हवे.
सीताबाई पवार, दिव्यांग कारंजा
कोड
अमरावती मध्यवर्ती बस स्थानक हे माेठे आगार आहे. रोज खेडे भागातून मोठ्या प्रमाणात प्रवासी येतात. अपंग आणि ज्येष्ठ व्यक्तींकरिता साेय करायला हवी.
- विनोद पारिसकर, ज्येष्ठ नागरिक