पहूर येथे चोरी. अलमारीतील सोन्याची पोत लंपास.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:10 IST2021-06-20T04:10:06+5:302021-06-20T04:10:06+5:30

काल रात्री पहूर येथील गणेश सितारामजी बेले यांच्या घरात दोन ते अडीच च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शिरून लाकडी कपाटातील ...

Theft at Pahur. Lampas gold texture in the cupboard. | पहूर येथे चोरी. अलमारीतील सोन्याची पोत लंपास.

पहूर येथे चोरी. अलमारीतील सोन्याची पोत लंपास.

काल रात्री पहूर येथील गणेश सितारामजी बेले यांच्या घरात दोन ते अडीच च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शिरून लाकडी कपाटातील सात ग्रॅम सोन्याची पोत लंपास केली. बेले यांचं घर गावाबाहेर टोकावर पूर्वेकडे शेतालाला लागून आहे. बेले कुटूंबिय गाढ झोपेत असताना घराचे शेता कडील दार तोडून चोरटे आत शिरले व त्यांनी घरातील खोलीचा दरवाजा उघडला व लाकडी अलमारीत डब्यात ठेवलेली सात ग्रॅम सोन्याची पोत लंपास केली. तसेच महत्त्वाचे कागदपत्रे असलेली सुटकेस लगतच्या शेतात नेऊन उघडली व मुलाच्या शाळेचे दप्तर ही शेतात नेले त्यात सुमारे दोन हजार रुपये होते. त्यातील पंधराशे रुपये चोरट्यांनी लंपास केले. असे बेले यांनी सांगितले.

.याप्रकरणी नांदगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.

Web Title: Theft at Pahur. Lampas gold texture in the cupboard.