लोखंडी, अल्युमिनिअमच्या साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST2021-01-08T04:38:23+5:302021-01-08T04:38:23+5:30
अमरावती : शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथे अज्ञात आरोपीने चोरी करून ॲल्युमिनिअमचे तसेच इतर साहित्य असा एकूण २८ हजार ...

लोखंडी, अल्युमिनिअमच्या साहित्याची चोरी
अमरावती : शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथे अज्ञात आरोपीने चोरी करून ॲल्युमिनिअमचे तसेच इतर साहित्य असा एकूण २८ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदविला.
फिर्यादी रवींद्र दत्तात्रय हिवलेकर (वय ५६, रा. न्यू आयटीआय कॉलनी, कांतानगर) यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. कॉलेज दोन महिन्यांपासून बंद होते. येथील चौकीदार मोरे यांना स्टोअर रूमचे ग्रिल तुटलेले दिसले. यासंदर्भाची माहिती त्यांनी फिर्यादींना दिली. त्यानंतर पाहणी केली असता ॲल्युमिनिअमचे जाॅळ, हाफ राऊंड फाईल, लोेखंडी छत्री, हायड्रोलिक पाईप, बेडिंग मशीन साचा अशा प्रकारच्या लोखंडी साहित्याची चोरी करण्यात आली.
तसेच इतर प्रात्यक्षिकेचे साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.