धानोरा (म्हाली) येथील एका घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:10 IST2021-06-21T04:10:08+5:302021-06-21T04:10:08+5:30

३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरू फोटो पी २० चांदूर चोरी चांदूर रेल्वे : तालुक्यातील ...

Theft at a house in Dhanora (Mhali) | धानोरा (म्हाली) येथील एका घरी चोरी

धानोरा (म्हाली) येथील एका घरी चोरी

३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास

पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरू

फोटो पी २० चांदूर चोरी

चांदूर रेल्वे : तालुक्यातील धानोरा (म्हाली) येथील एका घरी चोरी झाल्याची घटना १९ जून रोजी रात्री १.३० ते २.३० वाजेदरम्यान घडली. यामध्ये ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून, चांदूर रेल्वे पोलिसांकडून एका सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

चांदूर रेल्वेवरून ५ कि.मी. अंतरावरील धानोरा (म्हाली) येथील फिर्यादी नामे चंद्रशेखर भास्करराव इंगळे (वय ५६ वर्षे) यांच्या घरी कोणीतरी अज्ञात चोराने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील चांदीचा गोफ, जुनी वापरती सोन्याची नथ व रोख, असा एकूण ३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी चोरून नेला. त्यांनी दुपारी चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांच्या मार्गदर्शनात पो.हे.काँ. श्रीकृष्ण शिरसाट करीत आहेत.

===Photopath===

200621\img-20210620-wa0015.jpg

===Caption===

photo

Web Title: Theft at a house in Dhanora (Mhali)