बस आगारातून ईलेक्ट्रॉनिक टिकीट मशीनची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST2021-02-05T05:27:09+5:302021-02-05T05:27:09+5:30
अमरावती : येथील अमरावती मध्यवर्ती आगाराच्या विश्रामगृहात वाहक विसावा घात असताना अज्ञाताने २० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रॉनिक टिकीट मशीन ...

बस आगारातून ईलेक्ट्रॉनिक टिकीट मशीनची चोरी
अमरावती : येथील अमरावती मध्यवर्ती आगाराच्या विश्रामगृहात वाहक विसावा घात असताना अज्ञाताने २० हजार रुपये किमतीची इलेक्ट्रॉनिक टिकीट मशीन चोरून नेल्याची घटना गुरुवारी घडली. फिर्यादी अशोक संटी (गोरगोंडा अहेरी जि. गडचिरोली) यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसानी गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंविचे कलम ३८० अन्यवे गुन्हा नोंदविला.
---------------------------------------------------
मध्यवर्ती आगाराजवळून दुचाकी लंपास
अमरावती : येथील मध्यवर्ती आगार बन्सोड प्लॉझा मार्केटजवळून १९ हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच २७-झेड ८४३३ अज्ञाताने चोरून नेल्याची घटना २२ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी फिर्यादी संजय नत्थूजी कराळे (३९, रा. यशोदानगर) यांनी तक्रार नोंदविली.
-----------------------------------------------
महिलेची बदनामी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
अमरावती : मुलीच्या वडिलांना फोन करून तुझ्या मुलीसोबत प्रेमप्रकरण आहे, अशी खोटी माहिती देऊन बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी भातकुली पोलिसांनी एका युवकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. ही घटना बुधवारी घडली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
--------------------------------------------------
इसमाचा मृत्यू
अमरावती : एका ४० वर्षीय इसमाला नातेवाईकांनी इर्विन रुग्णालयात आणले असता, त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी सकाळी महेंद्र कॉलनीत घडली. सुधीर ज्ञानेश्वर बनकर (४०, रा. महेंद्र कॉलनी) असे मृताचे नाव आहे. मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.