सायबर कॅफेमध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST2021-07-20T04:11:24+5:302021-07-20T04:11:24+5:30
अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील सायबर कॅफेमध्ये अज्ञात आरोपीने चोरी करून त्यातील प्रिंटर व इतर साहित्य असा एकूण १० ...

सायबर कॅफेमध्ये चोरी
अमरावती : गाडगेनगर ठाणे हद्दीतील सायबर कॅफेमध्ये अज्ञात आरोपीने चोरी करून त्यातील प्रिंटर व इतर साहित्य असा एकूण १० हजारा ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना हनुमाननगरात घडली. फिर्यादी आश्विन विलासराव बोरकर (३०, रा. हनुमाननगर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला.
-----------------------------------------------------------
युवकावर चाकुहल्ला
अमरावती : कामावरून का काढले, या कारणावरून वाद होऊन एका युवकावर चाकुहल्ला चढविल्याची घटना नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी घडली. आदिल खान उर्फ गोलू नेर (रा. रोशननगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी फईम अहमद अब्दुल गफूर (४१, रा. सुफियाननगर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
-------------------------------
गोविंदनगरात चोरी
अमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील गोविंदनगर येथे अज्ञात आरोपीने चोरी करून घरातील एलसीडी व इतर साहित्य चोरून नेल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी फिर्यादी ओंकार गोविंद पेठणकर (७८, रा. चुनाभट्टी) यांनी तक्रार नोंदविली.