शेंदूरजनाघाटच्या मध्यवर्ती बँकेत चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:01 IST2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:01:29+5:30

बँकेतील रक्कम तशीच ठेवून चोरट्यांनी दोन लॅपटॉपसह डीव्हीआर लंपास केल्याचा प्रकार ३० सप्टेंबरला सकाळी उघडकीस आला. परंतु, रक्कम तशीच ठेवून संगणक लंपास होण्यामुळे शंकेला पालवी फुटली आहे. शेंदूरजनाघाट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Theft in central bank of Shenandojghat | शेंदूरजनाघाटच्या मध्यवर्ती बँकेत चोरी

शेंदूरजनाघाटच्या मध्यवर्ती बँकेत चोरी

ठळक मुद्दे रविवार सुटीचे दिवस असल्याने कुणीही फिरकले नाही.

शेंदूरजनाघाट : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तिवसाघाट रोडवरील शाखेत मध्यरात्रीनंतर भिंत फोडून अज्ञात चोरट्यांंनीचोरीचा प्रयत्न केला. परंतु, बँकेतील रक्कम तशीच ठेवून चोरट्यांनी दोन लॅपटॉपसह डीव्हीआर लंपास केल्याचा प्रकार ३० सप्टेंबरला सकाळी उघडकीस आला. परंतु, रक्कम तशीच ठेवून संगणक लंपास होण्यामुळे शंकेला पालवी फुटली आहे. शेंदूरजनाघाट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्राप्त माहितीनुसार, २७ सप्टेंबरला सायंकाळी ६ वाजता बँक बंद करून सर्व कर्मचारी निघून गेले. यातच शनिवार, रविवार सुटीचे दिवस असल्याने कुणीही फिरकले नाही. ३० सप्टेंबरला व्यवस्थापकांनी शेंदूरजनाघाट पोलिसांना चोरीची माहिती दिली. ठाणेदार उपनिरीक्षक सचिन कानडे, हेका कुंदन मुधोळकर, गणेश पोराटे, स्वप्निल बावस्कर, नीलेश डफळे यांच्या पथकाने तपासणी केली. तिजोरीतील रक्कम सुरक्षित असल्याने चोरट्यांचा नेमका हेतू काय होता, हा प्रश्न चर्चेचा विषय आहे. पोलिसांनी भादंविचे कलम ४५४, ४५७, ३८०, ५११ अन्वये गुन्हा दाखल केली आहे.

Web Title: Theft in central bank of Shenandojghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर