शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:47 IST

कुलसचिवांचे पत्र : संस्थाचालक, प्राचार्यांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीवर असलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांच्या स्वाक्षरीने २४ जानेवारी रोजी संस्थाचालक अध्यक्ष, सचिव आणि प्राचार्याच्या नावे त्या अनुषंगाने पत्र पाठविण्यात आले आहे. आता संस्थाचालकांना त्यांच्या स्तरावर असलेल्या रिक्त पदांना शासनाकडून मान्यता मिळवून रिक्त पदे भरता येणार आहेत.

गत पाच वर्षांपासून महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीवर स्थगिती असल्याने कोणतेही पद भरता आले नाही. मात्र राज्यपालांचे प्रधान सचिव यांच्या २६ नोव्हेंबर २०२४ च्या विद्यापीठात पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त पत्राच्या आधारे अमरावती विद्यापीठ कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी रिक्त पदांबाबत पदभरती करता येईल, असे कळविले आहे. त्यामुळे महाविद्यालयांत रिक्त पदांची वाणवा संपणार आहे. अमरावती, अकोला, वाशिम यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यांतील अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.

'ती' पदभरती करता येणार महाविद्यालयाच्या प्राचार्य पदभरतीवर स्थगिती नव्हतीच. आता केवळ राज्य शासनाच्या वित्त विभागाने २०१८ मध्ये पदभरतीला परवानगी दिली होती. त्यात काही वादग्रस्त पदे, न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली पदे, संस्था अंतर्गत वाद अशी काही पदे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत, ती पदे आता भरता येणार आहेत. सरसकट पदभरती करता येणार नाही, असे राज्यपालांच्या २६ नोव्हेंबर २०२४ च्या पत्रात नमूद आहे, असे विभागाचे उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे म्हणाले. 

अमरावती विद्यापीठातील १३ शिक्षक पदभरतीवर स्थगिती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात विधानसभा निवडणुकीपूर्वी १३ शिक्षक पदभरतीला मान्यता प्रदान करण्यात आली होती. मात्र, यात काही तांत्रिक बाबींवर आक्षेप घेण्यात आल्यामुळे या १३ शिक्षक पदभरतीवर अद्यापही स्थगिती कायम आहे.

"महाविद्यालयांतील रिक्त पदांचा प्रस्ताव मान्य करून आणण्याची जबाबदारी ही संस्थाचालकांची आहे. शिक्षण सहसंचालक कार्यालय ते पुढे राज्य शासन ही सर्व प्रक्रिया संस्थानाच करावी लागेल." - डॉ. अविनाश असनारे, सकुलसचिव, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :AmravatiअमरावतीEducationशिक्षणTeacherशिक्षक