तरुणीवर शारीरिक बळजबरी करणारा पोलीस अंमलदार निलंबित
By प्रदीप भाकरे | Updated: March 16, 2023 20:21 IST2023-03-16T20:21:51+5:302023-03-16T20:21:57+5:30
अमरावती : आरोपी तरूणीला प्रेमजाळात ओढून तिच्यावर शारीरिक बळजबरी करणाऱ्या पोलीस अंमलदाराला निलंबित करण्यात आले आहे. निलेश जगताप (३८, ...

तरुणीवर शारीरिक बळजबरी करणारा पोलीस अंमलदार निलंबित
अमरावती: आरोपी तरूणीला प्रेमजाळात ओढून तिच्यावर शारीरिक बळजबरी करणाऱ्या पोलीस अंमलदाराला निलंबित करण्यात आले आहे. निलेश जगताप (३८, रा. नवसारी) असे निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. परिमंडळ १ मध्ये येणाऱ्या पोलीस ठाण्यात तो कार्यरत होता.
१४ मार्च रोजी पिडित २० वर्षीय तरूणीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी त्याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. तशी माहिती एसीपी व डीसीपीद्वारे सीपी नविनचंद्र रेड्डी यांना देण्यात आली. गुन्हा दाखल होताच त्याच्या निलंबनाचे आदेश सीपींनी काढले. दरम्यान, गुन्हा दाखल होताच आरोपी निलेश हा रफुचक्कर झाला असून, गाडगेनगर पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहे. शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत एखादया अंमलदारावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना ठरली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यातील महिला आरोपीला मदत करण्याच्या बहाण्याने निलेशने तिच्यावर अत्याचार केला होता.