शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतून अमरावतीत एम.डी. ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला बेड्या; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 00:19 IST

अमरावती: शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवत असताना, अमरावती शहर गुन्हे शाखेने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

अमरावती: शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवत असताना, अमरावती शहर गुन्हे शाखेने एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबईवरून अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन (एम.डी.) पावडरचा पुरवठा करणाऱ्या मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अमली पदार्थ माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाला २० मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की, नागपुरी गेट पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्यात हवा असलेला मुख्य आरोपी अजिम असद शेख (३६, रा. माहीम, मुंबई) हा एम.डी. पावडरची विक्री करण्यासाठी अमरावतीत येणार आहे. या माहितीच्या आधारे लालखडी ते नवसारी रिंग रोड परिसरात सापळा रचण्यात आला. यादरम्यान, अजिम शेख आणि त्याला मदत करणारा स्थानिक आरोपी शेख समीर शेख आमीर (२५, रा. गवळीपुरा, अमरावती) या दोघांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

दोन्ही आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून ७८ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) पावडर आणि तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत अंदाजे ११ लाख ७० हजार रुपये असून, एकूण मुद्देमाल १२ लाख १६ हजार रुपयांचा आहे. पोलीस तपासात धक्कादायक बाब समोर आली की, या रॅकेटचे जाळे राजस्थानपर्यंत पसरले असून, आरोपींनी तिथून २ किलो ५०० ग्रॅम एम.डी. खरेदी केले होते. आतापर्यंत या प्रकरणात एकूण २ किलो २२० ग्रॅम मुद्देमाल (किंमत ३ कोटी ३४ लाख रुपये) जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २३ मार्च पर्यंत पोलीस कोठडी  सुनावली आहे. तसेच, बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एका गुन्ह्यात हवा असलेला आणखी एक मुख्य पुरवठादार सत्यम गणेश सोनवणे (रा. कुर्ला, मुंबई) यालाही गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्याला पुढील तपासासाठी बडनेरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज तस्करीचे मोठे नेटवर्क उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai MD drug supplier arrested in Amravati; major crime branch action.

Web Summary : Amravati police busted a drug racket, arresting key Mumbai supplier of MD and accomplices. ₹12.16 lakh worth drugs seized. Investigation reveals Rajasthan links. Further investigation is underway.
टॅग्स :amravati-acअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी