शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
4
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
5
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
6
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
7
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
8
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
9
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
10
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
11
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
12
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
13
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
14
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
15
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
16
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
17
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
18
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
19
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
20
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला

महापालिकेचा मुख्य आपात्कालीन कक्ष २४ बाय ७ कार्यान्वित

By प्रदीप भाकरे | Updated: June 1, 2024 13:45 IST

आयुक्तांनी घेतली बैठक : वालकट कंपाऊंडस्थित अग्निशमन विभागाकडे जबाबदारी

अमरावती: पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर महापालिकेच्या वतीने १ जूनपासून वॉलकट कंम्पाऊंडस्थित अग्निशमन विभागात मुख्य आपातकालीन कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. तो कक्ष ३० सप्टेंबरपर्यंत २४ बाय ७ असा कार्यरत राहील. महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी त्यासंदर्भात बैठक घेत मान्सूनपुर्व कामांचा आढावा घेतला.

             

आपातकालीन नियंत्रण कक्षामध्ये तीन पाळीमध्ये कामकाज चालणार असून प्रत्येक पाळीमध्ये एक नियंत्रण कर्मचारी, एक नियंत्रण अधिकारी व कर्मचारी कार्यान्वित असतील. त्यांना आवश्यक असणारे फावडे, घमेले, दोरखंड, घन, टिकास, कु-हाडी, बॅटरी, इत्यादी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच नियंत्रण कक्षासाठी वाहन चालक पुरविण्यात आले आहे. नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्याचे काम सुध्दा नियंत्रण कक्षामार्फत होणार आहे.

           

हवामान खात्याने राज्यात यावर्षी किमान सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याच्या अंदाज वर्तवला आहे. पावसाच्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मनपाच्या सर्व यंत्रणांनी सज्ज असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपत्तीच्या काळात सर्व संबंधित मनपा यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी सुचना मनपा आयुक्त देविदास पवार यांनी केली आहे. अमरावती महानगरपालिकेने नैसर्गिक आपत्ती उपाययोजना आराखडा तयार करण्यात आला आहे. अमरावती शहरात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आवश्यक ती उपाय योजना तयार करण्याच्या दृष्टीने आपातकालीन कक्षाचे प्रमुख म्हणून अग्निशमन विभाग अधीक्षक अजय पंधरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभागाअंतर्गत आपतकक्षाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त हे राहतील.

 

यावर झाली चर्चाबैठकीत अनेक महत्वपुर्ण विषयांवर चर्चा झाली. तसे आदेश देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापना कक्षाची झोन निहाय स्थापना करणे, महानगरपालिकेच्या विविध विभागांकरिता एसओपी तयार करणे, शोध व बचाव पथकाची स्थापना करणे, शहरातील नाल्यांच्या गाळ काढणे, विद्युत, प्रकाश व्यवस्था अद्यावत ठेवणे, शहरातील संभाव्य पुरग्रस्त भागाचा शोध घेऊन नोंद ठेवणे, औषधी साठा पुरवठा व वितरण व्यवस्था करणे, ब्लिचिंग पावडर व इतर रोग नियंत्रक इत्यादीची फवारणी करणे, आपातकालीन स्थितीत निवा-याची व्यवस्था करणे, शहरातील शिकस्त इमारतीची नोंद घेणे व घरमालकांना नोटीस बजावणे. 

सर्व विभाग प्रमुखाने आपआपल्या विभागाची जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे व जबाबदारीने पार पाडण्याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनुष्यबळाने सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी.

देविदास पवार, मनपा आयुक्त

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दलAmravatiअमरावती