भोई समाजाचा पहिला आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही; बच्चू कडूंचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2023 18:23 IST2023-01-06T18:23:01+5:302023-01-06T18:23:09+5:30

महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

The first MLA of the Bhoi community will not remain until it is elected; Determination of MLA Bachu Kadu | भोई समाजाचा पहिला आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही; बच्चू कडूंचा निर्धार

भोई समाजाचा पहिला आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही; बच्चू कडूंचा निर्धार

अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात भोई समाजाचा विदर्भस्तरीय उपवर वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू बच्चू कडू यांनी एक मोठं वक्तव्य केलं. काळ जर चांगला राहिला. तसेच प्रहार संघटना जर मजबुतीने समोर आली, तर प्रहार संघटनेचा भोई समाजाचा पहिला आमदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत सर्व समाजाचे आमदार झाले. मात्र भोई समाजाचा आमदार झाला नाही, अशी खंत देखील बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये मी भटक्या विमुक्त जातीचा राज्यमंत्री होतो. यात आम्हाला अडीच वर्षे भेटले. या काळात उद्धव ठाकरेंचा साक्षात्कार होता. चांगल्या गतीने ते काम करत होते. त्यामुळे आमचे अडीच वर्षे वाया गेले, असं म्हणत बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. 

Web Title: The first MLA of the Bhoi community will not remain until it is elected; Determination of MLA Bachu Kadu