शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीची लढाई जाती-धर्मासाठी नसून शेवटच्या माणसाच्या हक्कासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 11:07 IST

Amravati : बच्चू कडू यांची भावनिक साद; करजगावच्या सभेने मोडला गर्दीचा विक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सामान्य नागरिकांच्या मतामध्ये मोठी ताकद आहे. एका मताने सत्ता परिवर्तन होऊ शकते तर तुमच्या एका मताने दिव्यांग मंत्रालय स्थापन करता येऊ शकते, असे मत परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी गुरुवारी करजगाव येथील प्रचार सभेत व्यक्त केले. सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांचा मतदारसंघात मोठ्या उत्साहात प्रचार सुरू आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव येथे प्रचार रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करजगाव येथील सभेला रमेशराव भेंडे, संजाबराव कविटकर, ऊकंडराव नागोसे, प्रसन्ना वाकोडे, गजेंद्र दहिकर, दामूभाऊ उमक, रामभाऊ ठाकरे, तैयब भाई, जावेद खान, पठाण झाकीर हाजी साहब मोहसीन जमील, तस्लिम खान, जावेद भाई, महेमूद भाई, जमील भाई, मुबारिक भाई, रमेश सोनार, बाळा धाडसे, अमित शिरभाते आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, प्रहारचा झेंडा हा समाजसेवेचा झेंडा आहे. मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे, दिव्यांग मंत्रालय निर्माण करणे हे केवळ तुमच्यासारख्या सुज्ञ जनतेच्या सहकार्याने शक्य झाले आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या पाठीशी सदैव उभा राहून त्यांच्यासाठी आपला अविरत लढा सुरूच आहे. शिवाय विविध धार्मिक कार्यातसुद्धा आपण महाराष्ट्रातील इतर आमदारांच्या पुढे असून, आपल्या मतदारसंघात शेकडो कोटी रुपये धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धारासाठी उपलब्ध केले. एवढेच नाही तर करजगाव येथील कार्तिक स्वामी मंदिराला 'ब' वर्ग दर्जा प्राप्त करून देत तीन कोटी रुपये मंदिराच्या विकासासाठी उपलब्ध करून दिले. यामुळे मंदिराचा कायापालट सुरु असल्याचे ते म्हणाले.

बच्चू कडू यांचा करजगाव भागात प्रचाराचा झंझावात सुरू आहे. गुरुवारी त्यांनी दोन्ही गावांतील मंदिरात जाऊन दर्शन घेत प्रचार यात्रेला सुरुवात केली. त्यांनतर त्यांची जंगी सभा पार पडली. या सभेमध्ये जमलेल्या गर्दीने बच्चू कडू यांच्या विजयाचे चित्र स्पष्ट असल्याचे जाणवत होते. यावेळी महिलांनी बच्चू कडू यांचे औक्षण करत त्यांना शुभकामना दिल्या. चौकाचौकात त्यांचे जंगी स्वागत करून कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी विजयाच्या घोषणा दिल्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Bachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती