शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

युती, आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच! काँग्रेस बुरूज शाबूत राखेल की भाजप मुसंडी मारेल?

By गणेश वासनिक | Updated: October 26, 2024 12:30 IST

जिल्हा अमरावती गणेश वासनिक, लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : महायुती , महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच झाली असली जाहीर झालेल्या ...

जिल्हा अमरावती

गणेश वासनिक, लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : महायुती, महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच झाली असली जाहीर झालेल्या उमेदवारीवरून काँग्रेसला बुरूज शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान आहे, तर यंदा भाजपने मित्रपक्षाच्या मदतीने आमदारांच्या संख्येत वाढ करण्याची रणनीती आखली आहे. जिल्ह्यातील आठपैकी तीन मतदारसंघ काँग्रेस, दोन प्रहार, तर भाजप, अपक्ष अन् स्वाभिमानी पक्ष असे मिळून प्रत्येकी एक, अशी संख्या आहे. जागा वाटपात भाजपवर अन्याय झाल्याचा सूर असला तरी येत्या काळात महायुती धर्म पाळला जातो का? यावरही बरेच  चित्र अवलंबून असणार आहे.

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही दिवसांत भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत अमरावती जिल्ह्यातून दोन  उमेदवारांच्या नावांची घोषणा केली, तर शिंदेसेनेला दर्यापूर तर अजित पवार गटानेही अमरावतीत विद्यमान आमदाराला संधी दिली आहे. महायुतीतून बडनेराची जागा युवा स्वाभिमानला जाणार आहे, तर दुसरीकडे मेळघाट, मोर्शीच्या जागेबाबत महायुती, महाविकास आघाडीत एकमत झाले नाही. महाविकास आघाडीत दर्यापूरसाठी काँग्रेस आणि उद्धवसेनेत चर्चेच्या फैरी सुरूच आहे. बडनेऱ्यात उद्धवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे. मात्र, महाविकास आघाडीतून काँग्रेसला अमरावती, तिवसा, धामणगाव रेल्वे, अचलपूर या चार जागा मिळाल्या असून त्या सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे, तर भाजपला धामणगाव रेल्वे, अचलपूर, तिवसा, मेळघाट, मोर्शी या पाच मतदारसंघाव्यतिरिक्त मित्रपक्षाकडे असलेल्या दर्यापूर, बडनेरा, अमरावती या जागांवर नजरा लागल्या आहेत. 

वंचित, बसपाचे उमेदवारही मैदानात असतील. बंडखोरांची डोकेदुखी महायुती व महाविकास आघाडीला सहन करावी लागेल, असे तूर्त चित्र आहे. मात्र कोणत्या पक्षाकडे कोणती आणि कोणत्या पक्षाकडे उमेदवार यानंतरच मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४melghat-acमेळघाटamravati-acअमरावतीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी