कि डनी, मूत्रपिंड आजाराच्या ७८ शस्त्रक्रिया
By Admin | Updated: July 25, 2016 00:06 IST2016-07-25T00:06:09+5:302016-07-25T00:06:09+5:30
येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय गरिबांसाठी वरदान ठरले असून मूत्रपिंड विकार व किडनी आजाराने त्रस्त असलेल्या....

कि डनी, मूत्रपिंड आजाराच्या ७८ शस्त्रक्रिया
सुपर स्पेशालिटीच्या डॉक्टरांचे यश : २११ 'मेजर आॅपरेशन'
अमरावती : येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय गरिबांसाठी वरदान ठरले असून मूत्रपिंड विकार व किडनी आजाराने त्रस्त असलेल्या ७८ रुग्णांच्या अतिकठीण, तर २११ मेजर आॅपरेशन येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी केले आहे.
येथे दाखल झालेल्या १८८ रुग्णांच्या किरकोळ शस्त्रक्रियाही पार पडल्या आहेत. एप्रिल ते जून या तीन महिन्यात ६ हजार ३८९ बाह्य रुग्णांनी येथे तपासण्या केल्या होत्या. २४२१ रुग्ण येथे उपचारासाठी दाखल झाले होते. यापैकी २१६७ रुग्णांना डायलिसीसवर ठेवण्यात आले होते. किडनीच्या आजारात वाढ झाली असून त्यामुळे मूत्रपिंड विकारामध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. किडनी स्टोन, मूत्र मार्गातील अडथळा, प्रोस्टेट ग्रंथीची शस्त्रक्रिया तसेच किडनी निकामी झाल्यांतर डायलिसीस या आजारातही वाढ झाली आहे.
वाढते मधुमेहाचे प्रमाण, उच्च रक्तदाब, वेदनाशामक औषधी मोठ्या प्रमाणात सेवन करणे तसेच किडनीमध्ये जंतू संसर्ग होणे आदी कारणामुळे किडनीचा विकार जडू शकतो. त्यामुळे योग्यवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास पुढील आजार हे काही प्रमाणात टाळता येऊ शकतात. सर्व शस्त्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली, किडनी सर्जन राहुल पोटाडे, विक्रम देशमुख, विशाल बाहेकर, अभिजित ढाले, ओ.जी. मुंदडा, आदी तज्ज्ञ डॉक्टरांनी केल्या आहेत. त्यामुळे उपचार झालेल्या रुग्णांनी समाधान व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)
४८ रुग्णांवर सुगठन शस्त्रक्रिया
यावेळी ४८ रुग्णांचा अतिकठीन सुगठन शस्त्रक्रिया (प्लॅस्टिक सर्जरी) करण्यात आली आहे. तर ७ रुग्णांच्या मेजर तर १५९ जणांच्या किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. या आजाराच्या तपासणीसाठी ८०१ बाह्य रुग्ण तपासणी करण्यात आली असून १४६ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. येथील सुपरस्पेशालिटीमध्ये ही शस्त्रक्रिया नि:शुल्क करण्यात येत असून यामुळे गरीब रुग्णांना दिलासा मिळत आहे.