चाचण्यांचा आलेख माघारला, पॉझिटिव्हिटी मात्र वाढतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST2021-05-05T04:21:25+5:302021-05-05T04:21:25+5:30

अमरावती : जिल्ह्यात दररोज होणाऱ्या उच्चांकी आठ हजारांवर चाचण्या आता तीन ते चार हजारांदरम्यान आल्या असल्या तरी पॉझिटिव्हीचा आलेख ...

The test graph went back, but the positivity continued to grow | चाचण्यांचा आलेख माघारला, पॉझिटिव्हिटी मात्र वाढतीच

चाचण्यांचा आलेख माघारला, पॉझिटिव्हिटी मात्र वाढतीच

अमरावती : जिल्ह्यात दररोज होणाऱ्या उच्चांकी आठ हजारांवर चाचण्या आता तीन ते चार हजारांदरम्यान आल्या असल्या तरी पॉझिटिव्हीचा आलेख मात्र वाढताच आहे. महिनाभराचा आढावा घेता, चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी १९.१० टक्क्यांची आहे. परिणामी कोरोनाचा उद्रेक वाढताच असल्याचे स्पष्ट होते.

जिल्ह्यात फेब्रुवारीच्या अखेरपासून कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला. त्याच प्रमाणात चाचण्यांची संख्यादेखील वाढवावी लागली. जिल्ह्यात उच्चांकी आठ हजारांपर्यंत चाचण्या या काळात झाल्या. जिल्ह्यात सर्वाधिक आरटी-पीसीआर चाचण्या होतात व प्रसंगी रॅपिड अँन्टिजेन चाचण्यादेखील करण्यात येतात. रॅपिडच्या चाचण्या खासगी लॅबमध्ये करण्यास जिल्हाधिकाऱ्यांचे मनाई आदेश आहेत. ही चाचणी निगेटिव्ह आल्यास आरटी-पीसीआर चाचणी करावी लागते. मात्र, याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात सर्व प्रकारच्या चाचण्यांची संख्या आता ४.४० लाखांच्या घरात आहे. चाचण्यांची सर्वाधिक भिस्त ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेवर आहे. खासगीमध्ये येथील पीडएमएमसच्या प्रयोगशाळेत चाचण्या केल्या जातात. सर्वच तालुका मुख्यालयासह अमरावती येथल सात केंद्रांवरून नागरिकांचे स्वॅब घेतले जातात व या ठिकाणी रॅपिड अँन्टिजेन चाचणीदेखील करण्यात येते. याशिवाय महापालिकेचा आरोग्य विभाग व काही तालुका मुख्यालयी संचारबंदीमध्ये अकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली आहे व यामध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची थेट कोरोना केअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात आले आहे.

बॉक्स

पीडीएमएमसी लॅबमध्ये ४१.३२ टक्के पॉझिटिव्हीटी

विद्यापीठाचे लॅबमध्ये आतापर्यंत २,०६,९१२ आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ३२,६२८ अहवाल पॉझिटिव्ह आले, तर या चाचण्यांममध्ये सरासरी १५.८ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद करण्यात आली. याव्यतिरिक्त पीडीएमएमसीच्या लॅबमध्ये आतापर्यंत १३,९०१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५,७४४ अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये ४१.३२ टक्के पॉझिटिव्हिटी आहे. अन्य खासगी लॅबमध्ये २२,१२९ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ९,७६६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ४४.१३ टक्के पॉझिटिव्हीटी नोंद झालेली आहे.

बॉक्स

रॅपिड अँटिजेनमध्ये १०.४६ टक्के पॉझिटिव्हिटी

जिल्ह्यात आतापर्यंत १,८४५१० रॅपिड अँन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १९,३०० अहवाल पॉझिटिव्ह आले व १०.४६ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाली. महापालिका क्षेत्रात ८५,८७१ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ७,६७५ पॉझिटिव्ह व १०.१२ टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद झाली. याशिवाय ग्रामीणमध्ये १,०८,६३९ चाचण्या करण्यात आल्या. यात ११,६२५ अहवाल पॉझिटिव्ह आले व १०.७० टक्के पॉझिटिव्हिटीची नोंद करण्यात आली.

बॉक्स

शहरापेक्षा ग्रामीणमध्ये टेस्टिंग वाढल्या

एप्रिल महिन्यात ग्रामीण भागात संसर्ग वाढला. त्यामुळे साहजिकच टेस्टिंगदेखील वाढल्या. जिल्हा ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या माहितीनुसार, रोज अडीच हजारांपर्यंत नमुने घेतले जात आहेत, तर शहरात दीड ते दोन हजार नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. नव्या पॉझिटिव्हमध्ये ३० ते ३५ टक्के रुग्ण महापालिका क्षेत्रातील, तर ६५ ते ७० टक्के ग्रामीण भागातील असल्याची नोंद आहे.

कोट

या आठवड्यात चाचण्यांमध्ये सरासरी पाॅझिटिव्हिटी २२ टक्के आहे. चाचण्या थोड्या कमी झाल्या. आता रॅपिडच्या चाचण्यादेखील ग्रामीणमध्ये वाढविण्यात येत आहेत. एका रुग्णामागे ८ ते १० कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

(याचा ग्राफ काढावा, अशी सूचना आहे.)

दिनांक चाचण्या पॉझिटिव्ह पॉझिटिव्हिटी

१ एप्रिल २७१० २८८ १०.६२

८ एप्रिल ३८७४ ३७८ ९.७५

१५ एप्रिल २७५७ ५३४ १९.३६

२१ एप्रिल ३१०८ ५२० १६.७३

२८ एप्रिल ४०२६ ९४६ २३.४९

१ मे ३६९३ ९८० २६.५३

२ मे ३६०९ ८०४ २२.२७

३ मे ३४०४ ९०३ २६.५२

४ मे ०००० ००० ००००

Web Title: The test graph went back, but the positivity continued to grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.