कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:00:12+5:30
तिवसा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ पंचवटी चौकात कुऱ्हाहून मुरूम घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच २७ यू २५७६ व नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एमएच ०६ बीयू ७४१५ कारने ट्रॅक्टरला मागून जबर धडक दिली. या अपघातात वाहन चालक रितू दिवान (४२) व तिची मुलगी सोम्या दिवान (२७, रा. रायपूर) या थोडक्यात बचावल्या.

कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एका कारने मुरूमची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जबर धडक दिली. यात कारचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. या अपघातात आईसह मुलगी थोडक्यात बचावली. ही घटना तिवसाच्या पंचवटी चौकात सोमवारी सकाळी ६.३० वाजता घडली.
माहितीनुसार, अपघातातील मायलेक रायपूरहून अलिबागला जात होते. दरम्यान तिवसा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ पंचवटी चौकात कुऱ्हाहून मुरूम घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एमएच २७ यू २५७६ व नागपूरहून अमरावतीकडे जाणाऱ्या एमएच ०६ बीयू ७४१५ कारने ट्रॅक्टरला मागून जबर धडक दिली. या अपघातात वाहन चालक रितू दिवान (४२) व तिची मुलगी सोम्या दिवान (२७, रा. रायपूर) या थोडक्यात बचावल्या. यामध्ये रितू दिवान यांच्या हाताला व पायाला जबर मार लागला, तर मुलीलाच्या डोक्याला मार लागला आहे. मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तिवसा पोलिसांना माहिती देऊन जखमी महिला व मुलीला ऑटोमध्ये टाकून तिवसा ग्रामीण रुग्णालयात पोचविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला. ट्रॅक्टर व पोलीस ठाण्यात लावण्यात आला, चालकासही बसविले. या अपघातात जबर मार लागल्याने आई व मुलीला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.