शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएसआर’ निधीच्या वापराला अटी- शर्तींचे कोंदण; अनियमितता झाल्यास कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 16:17 IST

ग्रामपंचायत तथा जिल्हा परिषदांना मिळणा-या ‘सीएसआर’ निधीच्या विनियोगासाठी ग्रामविकास विभागाने नव्या अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. असा निधी ग्रामपंचायतींना प्राप्त झाल्यानंतर त्याचा वापर करताना काही ठिकाणी अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर विनियोगाबाबत गाइड लाइन आखून देण्यात आल्या आहेत.

अमरावती : ग्रामपंचायत तथा जिल्हा परिषदांना मिळणा-या ‘सीएसआर’ निधीच्या विनियोगासाठी ग्रामविकास विभागाने नव्या अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. असा निधी ग्रामपंचायतींना प्राप्त झाल्यानंतर त्याचा वापर करताना काही ठिकाणी अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर विनियोगाबाबत गाइड लाइन आखून देण्यात आल्या आहेत.           केंद्र शासनाच्या अधिनियमानुसार कंपन्यांना त्यांच्या नफ्याच्या प्रमाणात काही विहित निधी कार्पोरेट सामाजिक जबाबदारी निधी अर्थात कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ‘सीएसआर’ अंतर्गत सामाजिक बांधिलकी ठेवून समाजविकासासाठी खर्च करावयाचा आहे. या अंतर्गत काही कंपन्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकासकामांसाठी वस्तू वा रोख स्वरूपात निधी देतात. असा निधी ग्रामपंचायतीला मिळाल्यानंतर त्यात अनियमितता झाल्याची बाब उघड झाली. त्या पार्श्वभूमीवर लोकायुक्तांनी सीएसआर निधी कसा खर्च करावा, याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सुचित केले होते. त्या पार्श्वभूमीवर सीएसआर निधी वापराबाबत ग्रामीण स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यानुसार कंपंन्यांनी सीएसआर अंतर्गत वस्तू स्वरूपात मदत केल्यास त्याविषयीची यथायोग्य तपशीलवार नोंद नोंदवहीमध्ये घ्यावी. अशा वस्तू नियमित वापरात राहण्यासाठी त्या कंपन्यांकडून देखभाल निधी मिळत नसल्यास वार्षिक अंदाजपत्रकात तशी तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कंपन्यांनी सीएसआर निधी रोख स्वरूपात स्थानिक स्वराज्य संस्थेस दिल्यास सदर निधी स्वउत्पन्न म्हणून जमा करून खर्च करण्यात यावा, त्यासाठी शासनाच्या स्वउत्पन्नातून खर्च करण्याविषयीच्या तरतुदींचे पालन करावे, कंपन्यांनी हा निधी ठरावीक कामावर अथवा एखाद्या बाबीवर खर्च करण्याची अट टाकल्यास त्याच कामावर अथवा बाबीवर सर्व निधी खर्च करावा. तथापि, त्यासाठी अद्ययावत वित्तीय कार्यपद्धतीचे पालन करणे बंधनकारक असल्याची अट टाकण्यात आली आहे.

 ...तर कारवाईही स्वउत्पन्न किंवा शासननिधीतून अनियमितता झाल्यानंतर ज्याप्रमाणे संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येते, त्याचप्रमाणे सीएसआर अंतर्गत प्राप्त निधीमधून खर्च करताना काही अनियमितता घडल्यास, संबंधितांविरुद्ध यथायोग्य कारवाई करण्यात येणार आहे. तसे निर्देश अधिनस्थ यंत्रणेला देण्यात आले आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रzpजिल्हा परिषद