पारा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:34 IST2018-04-03T00:34:27+5:302018-04-03T00:34:27+5:30

शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून, मेचा फटका मार्चमध्येच जाणवू लागला आहे. शहराच्या तापमानाने चाळिशी ओलांडली असल्याने अमरावतीकर चांगलेच घामाघूम होऊ लागले आहेत.

Temperature climbed | पारा चढला

पारा चढला

ठळक मुद्देशहरवासीय घामाघूम : एसी, कूलर पंख्यांचा वापर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहराच्या तापमानात चांगलीच वाढ झाली असून, मेचा फटका मार्चमध्येच जाणवू लागला आहे. शहराच्या तापमानाने चाळिशी ओलांडली असल्याने अमरावतीकर चांगलेच घामाघूम होऊ लागले आहेत.
वाढत्या तापमानामुळे दुपारी उष्णतेच्या झळा लागू लागल्याने नागरिकांना बाहेर पडले टाळताहेत. उकाड्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी एसी कूलर पंख्यांचा वापर वाढला आहे, तर शीतपेयांच्या स्टॉलवर गर्दी होत आहे.
सकाळपासूनच उन्हाचे चटके
मागील आठवड्यापासून शहरासह जिल्हाभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. तीन दिवसांपासून पारा वाढला असून, तो सोमवारी ४० अंश सेल्सिअसवर गेला आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून पारा हा चाळिशीवर पोहोचल्याने यावर्षी उच्चांक गाठला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्म्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत आहेत. रणरणत्या उन्हामुळे दुपारी १ ते ४ या वेळेत रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा ४२ अंशावर पोहोचला आहे. वाढत्या उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरेशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मंदिरे, सार्वजनिक इमारती, हॉल, उद्याने आदी दुपारीसुद्धा उघडी ठेवावीत, जेणेकरून नागरिकांना दुपारच्या वेळी येथे आश्रय घेता येईल.

रुग्णालये सुरू ठेवा 

उन्हाची तीव्रता वाढली आहे. सध्या ४२ अंश सेल्सिअसवर पारा गेला आहे. पारा हा चाळिशीपार पोहोचल्याने यावर्षी उच्चांक गाठला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हातील रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर महत्त्वाच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होऊ नये, याची खात्री करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
जिल्हास्तरावरील उपाययोजना
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना उष्णतेच्या लाटेसाठी नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात यावे. उष्णतेच्या लाटेची पूर्वानुमान सूचना निर्गमित करण्याची तसेच यासंदर्भात इतर उपाययोजना राबविण्याची जबाबदारी नोडल अधिकाºयांची राहणार आहे. तालुकास्तरावर तहसीलदारावर नोडल अधिकारी म्हणून ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
९ एप्रिलपर्यंत विदर्भात हलका पाऊस?
विदर्भ, तेलंगणा व मराठवाड्यात ५ आणि ६ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी वावटळीसह गडगडाटी पावसाची शक्यता हवमानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे. याशिवाय ७ ते ८ एप्रिल दरम्यान काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तरेकडील मैदानी भागात धुळीच्या वादळाची शक्यता असून, मध्य भारतात उष्णतेची लाट ४८ तास कायम राहणार आहे. दरम्यान, कमाल तापमान ४० ते ४१ आणि किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सियस राहण्याचे संकेत आहेत. उत्तर छत्तीसगडवर १.५ किमी. उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, या वाºयापासून विदर्भ, मराठवाडा अंतर्गत कर्नाटकापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. लक्षद्वीपभोवताल दीड किमी उंचीवर चक्राकार वारे आहेत. या स्थितीवरून पावसाचा अंदाज बंड यांनी वर्तविला आहे.

Web Title: Temperature climbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.